शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकाची पाहणी : अश्लील पुस्तक पाहून प्रवासी समितीच्या अध्यक्षांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:30 IST

रेल्वे बोर्डाच्या रेल्वे प्रवासी सेवा समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. रमेश चंद्र रत्न यांनी आज नागपूरसह अजनी आणि गोधनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी बुक स्टॉलवर अश्लील पुस्तक पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देनिरीक्षणात आढळल्या भोजन व्यवस्थेतील त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाच्या रेल्वे प्रवासी सेवा समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. रमेश चंद्र रत्न यांनी आज नागपूरसह अजनी आणि गोधनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी बुक स्टॉलवर अश्लील पुस्तक पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.रेल्वे प्रवासी समितीच्या अध्यक्षांनी रेल्वेस्थानकाच्या पाहणी दौऱ्यात प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. बुक स्टॉलवर अश्लील पुस्तक पाहून त्यांनी लवकर पुस्तकांच्या विक्रीचा ठेला हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर कमसम हॉटेलमध्ये त्यांनी पाकिटबंद नाश्त्यावर उत्पादनाची माहिती नसल्यामुळे आक्षेप घेतला. त्यांनी कमसम हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अहवाल तपासला. खराब झालेले संत्रे आढळल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होणार असून अधिकाऱ्यांना ही बाब गंभीरतेने घेण्याची सूचना केली. जनाहार रेस्टॉरंटमध्ये त्यांना बिस्कीटांची पाकिटे आढळताच त्यांचा राग अनावर झाला. ज्याप्रमाणे करार झाला त्यानुसार खाद्यपदार्थ विकण्याची सूचना त्यांनी केली. लोको रनिंग रुमकडे जाताना त्यांना रस्त्यात प्लास्टिकने गुंडाळलेल्या लाकडांचे पार्सल आढळले. यावर त्यांनी वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, रेल्वे सुरक्षा दलाचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता एस. एन. हाजरा, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.प्रवासी सुविधांचा घेतला आढावाअ‍ॅड. रत्न यांनी बुलंद आर्ट गॅलरी, फ्रूट स्टॉल, बॉटल रिसायकलिंग मशीन, वॉटर व्हेंडींग मशीन, लेडिज वेटिंग हॉल, एसी वेटिंग हॉल, रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणे, रेल्वे चाईल्ड लाईन सेंटर, बुकिंग कार्यालय, टु व्हीलर पार्किंग परिसराची पाहणी केली. त्यांनी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. ई-तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी रेल्वे बोर्ड स्तरावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी अजनी आणि गोधनी रेल्वेस्थानकाची पाहणी केली.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर