शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:26 IST

नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा (नॉन सबरबन ग्रुप) दर्जा मिळाला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा देण्यात आला. त्यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘एनएसजी-२’ दर्जानुसार त्यात काय सोयीसुविधा राहतील, याबाबत आठवडाभरात चित्र स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे मंत्रालयाचा निर्णय : आठवडाभरात होणार विकास कामांचे चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा (नॉन सबरबन ग्रुप) दर्जा मिळाला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा देण्यात आला. त्यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘एनएसजी-२’ दर्जानुसार त्यात काय सोयीसुविधा राहतील, याबाबत आठवडाभरात चित्र स्पष्ट होणार आहे.रेल्वे स्थानकाला होणारे उत्पन्न आणि रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या संख्येनुसार त्या रेल्वे स्थानकाचा दर्जा ठरविला जातो. दर पाच वर्षांनी त्याची चाचपणी केली जाते. त्या अनुषंगाने २०१८ मध्ये नागपूर रेल्वे स्थानकाला हा दर्जा मिळाला आहे. यापूर्वी नागपूर स्थानकाला ए-१ चा दर्जा देण्यात आला होता. त्यानुसार सोयीसुविधात वाढ करण्यात आली होती. आता एनएसजी-२ म्हणजे ‘नॉन सबरबन ग्रुप’मध्ये नागपूरचा समावेश करण्यात आला आहे. ज्या रेल्वे स्थानकावरून लोकल गाड्या चालतात त्या स्थानकाचा सबरबनमध्ये समावेश होतो. नागपूर रेल्वे स्थानकाहून लोकल गाड्या चालविण्यात येत असल्यामुळे नागपूरचा समावेश नॉन सबरबन ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. तसेच १०० ते ५०० कोटी रुपये उत्पन्न देणाºया स्थानकांचा एनएसजी-२ मध्ये समावेश केला जातो. एकट्या नागपूर रेल्वे स्थानकातून वर्ष २०१६-१७ मध्ये ३३५.३९ कोटी रुपयांच्या रेल्वे तिकिटा विकण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रृजेश कुमार गुप्ता यांच्या पुढाकाराने नागपूर स्थानकाचा चेहरामोहरा बदलला आहे. रेल्वे स्थानकावर नागपूरसह आजूबाजूच्या पर्यटनस्थळांचे दर्शन घडविणाºया कलाकृती दाखविण्यात आल्या आहेत. याशिवाय गार्डन आणि आॅर्ट गॅलरीही तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्लॅटफार्मवर एस्क्लेटर (स्वयंचलित जिना) कामही सुरू आहे. आता रेल्वे मंत्रालयाकडून एनएसजी-२ दर्जा मिळाल्यानंतर या सुविधात आणखी वाढ होणार आहे.चित्र स्पष्ट होताच विकास कामांना गती‘नागपूर रेल्वे स्थानकाला पूर्वी ए-१ दर्जा देण्यात आलेला होता. रेल्वे मंत्रालयाने या दर्जात वाढ करून आता ‘एनएसजी-२’ हा दर्जा दिला आहे. नव्या दर्जानुसार रेल्वे स्थानकावर कोणत्या सोयीसुविधा, बदल करावयास हवेत, हे स्पष्ट झाल्यानंतर विकास कामांना गती देण्यात येईल.’ए. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर