शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानक : वर्षभरानंतरही फूट ओव्हब्रिजचे काम थंडबस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:57 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ वरून एक अरुंद असलेला फूट ओव्हरब्रिज (एफओबी) प्लॅटफार्म क्रमांक ६ कडे जातो. हा फूट ओव्हरब्रिज रुंद करण्याच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात आली. परंतु अद्याप या एफओबीचे काम सुरू झाले नसून प्रवाशांना दाटीवाटीने अरुंद पुलावरून ये-जा करावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : अरुंद पुलावरून करावी लागते ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ वरून एक अरुंद असलेला फूट ओव्हरब्रिज (एफओबी) प्लॅटफार्म क्रमांक ६ कडे जातो. हा फूट ओव्हरब्रिज रुंद करण्याच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात आली. परंतु अद्याप या एफओबीचे काम सुरू झाले नसून प्रवाशांना दाटीवाटीने अरुंद पुलावरून ये-जा करावी लागत आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या इटारसी एण्डकडील भागात जुना फूट ओव्हरब्रिज असून तो प्लॅटफार्म क्रमांक ७ पर्यंत आहे. या फूटओव्हरब्रिजच्या ठिकाणी प्लॅटफार्म क्रमांक ८ पर्यंत जाणाऱ्या फूट ओव्हरब्रिज रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी मान्यता दिली. त्यासाठी मागील वर्षी निविदा प्रक्रियाही पार पडली. परंतु वर्षभरात या फूट ओव्हरब्रिजचे इंचभरही काम झाले नाही. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा फूट ओव्हरब्रिज तयार करण्यासाठी ९ कोटी रुपयांचे कंत्राट वर्षभरापूर्वी देण्यात आले. या कामात लिफ्ट लावण्याची तरतूदही आहे. मुंबईच्या कंत्राटदाराने नागपूर रेल्वे विभागाच्या प्रशासनाला पुलाचे ड्रॉईंग सोपविले. त्यास मुंबई मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु हे ड्रॉईंग येथे पास न होता परत संशोधनासाठी नागपूरला पाठविण्यात आले. कंत्राटदाराने पुन्हा संशोधित ड्रॉईंग मुख्यालयात पाठविले. परंतु पुन्हा ते नामंजुर करण्यात आले. तेंव्हापासून ड्रॉईंग पाठविण्याचे आणि ते नामंजूर करण्याचे कामच सुरु असल्यामुळे फूट ओव्हरब्रिजचे काम रखडले आहे. यात संबंधित कंत्राटदाराने वर्षभरापूर्वी कमी बोली लावून कंत्राट मिळविले आहे. आता बांधकामाचे साहित्य आणि मजुरांच्या मजुरीत वाढ झाल्यामुळे तो सुद्धा काम करण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.लिफ्टचे कामही अपूर्णनव्या फूट ओव्हरब्रिजसोबत इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १, २/३, ४/५, ६/७ आणि ८ वर एकूण ५ लिफ्ट लावण्यात येणार होत्या. परंतु याचे कंत्राट देऊन वर्ष उलटल्यानंतरही एकही लिफ्ट लावण्यात आली नाही. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर