शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानक; रस्त्यावरील धूळ समोसा, कचोरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:30 IST

नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या शेजारी ठेलेवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. परंतु येथे खाद्यपदार्थ विकताना नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठलीच खबरदारी घेण्यात येत नसल्याची बाब जाणवली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या शेजारी ठेलेवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. परंतु येथे खाद्यपदार्थ विकताना नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठलीच खबरदारी घेण्यात येत नसल्याची बाब जाणवली. उघड्यावर तेथे खाद्यपदार्थ तयार केली जातात आणि ती खुल्यावर ठेवूनच विकली जातात. त्यावर रस्त्यावरील धूळही उडते.

खाद्यपदार्थांच्या शेजारीच डस्टबिनरेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक आमलेट विक्रेता आहे. रस्त्यावरच त्याने दुकान थाटले आहे. आमलेट तयार करण्यासाठी असलेला तवा आणि इतर खाद्यपदार्थांच्या बाजूलाच या दुकानदाराने डस्टबिन ठेवलेली आढळली. याशिवाय दुकानाच्या मागील बाजूने नालीत घाण पाणी साचलेले होते. अशा वातावरणात ग्राहकांना तो खाद्यपदार्थ देत होता.

समोसा अन् कचोरी उघडीचरेल्वेस्थानकासमोरील राजकुमार हॉटेल आणि न्यू जनता हॉटेलमध्ये समोसा आणि कचोरी उघड्यावर विक्रीसाठी ठेवले होते. समोरच मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरील धूळ सहज या खाद्यपदार्थांवर जाऊ शकते. तरीसुद्धा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे खाद्यपदार्थ झाकून ठेवण्याची तसदी दोन्ही हॉटेल्सचालकांनी घेतली नाही.

उघड्यावर ठेवले पोहेरेल्वेस्थानक परिसरात डीआरएम कार्यालयाच्या समोर सेंट्रल एव्हेन्यु मार्गावर एका पोहेवाल्याचा ठेला आहे. या दुकानदाराने पोहे तयार करून ते ठेल्याच्या सर्वात वरच्या भागात ठेवलेले होते. या मार्गावरून दिवसाकाठी हजारो वाहने ये-जा करतात. त्यांचा धूर आणि रस्त्यावरील धूळ सहजच या पोह्यांवर बसते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून हा विक्रेता पोहे विकत होता.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग