शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानक होणार वर्ल्ड क्लास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:03 IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पदरात काय पडले, हे स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात ६०० प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास स्टेशन बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देअजनी, इतवारी स्थानकाचा होईल विकास, अर्थसंकल्पात निधीची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पदरात काय पडले, हे स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात ६०० प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास स्टेशन बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केली असल्याचा अंदाज आहे. अजनी रेल्वेस्थानकावर अर्थमंत्र्यांची कृपादृष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजनी रेल्वेस्थानकाला मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड हब बनविण्याच्या दृष्टीने आवश्यक निधी मिळण्याची शक्यता आहे. नागपूर आणि अजनीशिवाय वर्धा, गोंदिया रेल्वेस्थानकावर स्वयंचलित पायऱ्या  (एस्केलेटर), सीसीटीव्ही कॅमेऱ्या साठी निधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय माजरी, गोधनी, खापरी रेल्वेस्थानकांना आदर्श स्थानक बनविण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा देण्यासाठी पुरेसा निधी मिळणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच इतवारी-छिंदवाडा, इतवारी-नागभीड ब्रॉडगेज, वडसा-देसाईगंज ब्रॉडगेज प्रकल्पाव्यतिरिक्त नागपूर-वर्धा थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रात्रीपर्यंत अपलोड झाले नाही पिंकबुकमागील अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तासाभरात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदींबाबतचे पिंकबुक इंटरनेटवर अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे नागपूरसह विदर्भाला काय मिळाले, याची माहिती कळली. परंतु यावर्षी पिंकबुक अपलोड झाले नसल्यामुळे रेल्वे अधिकारी आणि पत्रकार सायंकाळी उशिरापर्यंत पिंकबुकची वाट पाहत बसले होते.५ फेब्रुवारीला स्पष्ट होणार स्थितीरेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारीपर्यंत पिंकबुक येणार आहे. त्यानंतरच मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला कोणत्या नव्या योजना आणि निधी मिळाला, हे स्पष्ट होणार आहे.दुरांतो, विदर्भ, सेवाग्राममध्ये सीसीटीव्हीअर्र्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार आता नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेससह सर्व गाड्यात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरBudget 2018अर्थसंकल्प २०१८