शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर ३३ किलो गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:02 IST

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलो गांजा जप्त केल्यानंतर गुरुवारी पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक ३ वर बेवारस अवस्थेत असलेल्या तीन बॅगमधून ३३ किलो गांजा जप्त केला आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : तीन बॅगमध्ये होते १६ पाकिट

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलो गांजा जप्त केल्यानंतर गुरुवारी पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक ३ वर बेवारस अवस्थेत असलेल्या तीन बॅगमधून ३३ किलो गांजा जप्त केला आहे.रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केलेल्या गांजाची किंमत ३.३० लाख आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या क्राईम डिटेक्शन टीमच्या सदस्य महिला आरक्षक पुनम रेडु यांना गुरुवारी दुपारी ४ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्र मांक ३ वर इटारसी एण्डकडील भागात तीन बेवारस बॅग आढळल्या. त्यांनी आजूबाजूच्या प्रवाशांना विचारना केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यांनी उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना याबाबत सूचना दिली. एडले यांनी कमांडंट सतीजा यांना माहिती दिली. सतीजा यांच्या आदेशानुसार श्वानपथकाचे सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल यांनी श्वान रेक्ससोबत घटनास्थळी येऊन बॅगची पाहणी केली. बॅगमध्ये मादक पदार्थ असल्याचा संकेत श्वान रेक्सने दिला. त्यानंतर बॅग उघडून पाहिल्या असता त्यात १६ पाकिटात ३.३० लाख किमतीचा ३३ किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. कागदोपत्री कारवाईनंतर जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरDrugsअमली पदार्थ