शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांच्या विळख्यात नागपुरातील मनोरुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:03 IST

उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात वर्ग ‘अ’मधील मानसोपचार तज्ज्ञाची मंजूर नऊही पदे रिक्त आहेत, तर वर्ग ‘ड’मधील मंजूर २३४ पैकी १०८ पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देमानसोपचार तज्ज्ञाच्या ९ जागा रिक्त : ‘वर्ग ड’ची १०८ पदे रिक्त : कसा होणार रुग्णांचा सांभाळ ?

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकारतज्ज्ञांची साथ मोलाची असते. मात्र उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात वर्ग ‘अ’मधील मानसोपचार तज्ज्ञाची मंजूर नऊही पदे रिक्त आहेत, तर वर्ग ‘ड’मधील मंजूर २३४ पैकी १०८ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर रुग्णांची विशेष जबाबदारी असते त्या स्त्री-पुरुष परिचरांची २०७ पैकी १०० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा हा विळखा घट्ट होत चालल्याने मनोरुग्णालयाच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे.मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयाची स्थापना केली. मात्र, शासनाचे या रुग्णालयाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: रिक्त पदांमुळे नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय अडचणीत आले आहे. मनोरुग्णालयात वर्ग ‘अ’मध्ये मानसोपचार तज्ज्ञाच्या नऊ जागा मंजूर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासूनही सर्वच जागा रिक्त आहेत. रुग्णांच्या उपचाराचा भार वर्ग ‘ब’मधील नऊ मानसोपचार तज्ज्ञांवर आला आहे. डॉक्टरांसोबतच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निम्मे पदे रिक्त आहेत. प्राप्त माहितीनुसार, वर्ग ‘ड’ची २३४ पदे मंजूर असताना १०८ पदे रिक्त आहेत. यातही मनोरुग्णांची जबाबदारी असलेल्या १८० स्त्री-पुरुष परिचरमधून १०१ पदे भरली असून ७९ पदे रिक्त आहेत. यातील श्रेणी-१मधील स्त्री-पुरुष परिचरची २७ मधील तब्बल २१ पदे रिक्त आहेत. यामुळे मनोरुग्णांचा सांभाळ करणे रुग्णालय प्रशासनाला कठीण होऊ लागले आहे. औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाल्याने असंख्य जीवघेण्या आजारांवर मानवाने मात केली. मात्र, रिक्त पदांचा दशावतार दूर करण्यात शासनाला यश मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर