शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलिसांची कामगिरी समाधानकारक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:28 IST

नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

ठळक मुद्देअजून सुधारणा करणे आवश्यक

ऑनलाईन लोकमत नागपूर : नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.सदस्य सुनील केदार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर पोलीस कार्यक्षम आहे. पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून सुधारणा करुन गुन्ह्यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. नागपूर पोलीस आयुक्तांनी भूमाफियाविरुद्ध कठोर कारवाई केली. त्यांनी यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. यावर पोलिसांनी कारवाई करत भूमाफियांच्या कब्जात वर्षानुवर्षे असलेली जमीन सामान्य नागरिकांना परत देण्यात आली. यासाठी सर्व स्तरातून नागपूर पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. नागपूर पोलिसांनी सेफ्टी परसेप्शन इंडिकेशन तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. नागपूर पोलिसांच्या कामात गुणात्मक फरक पडला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी भाग घेतला.‘भरोसा सेल’ अभिनव उपक्रमनागपूर पोलीस आयुक्तालयाने राज्यात अभिनव असा ‘भरोसा सेल’ हा उपक्रम चालू केला असून महिलांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई, समुपदेशन आदी उपक्रम राबविले जातात. त्याचे काम कसे चालते, हे आमदार महिलांनाही दाखवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.व्हीसीएवरील कारवाईची चौकशी होणारसुनील केदार यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पास न दिल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याबाबतचा उपप्रश्नाला उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, विदर्भ क्रिकेट असोसिएशन विरोधात केलेली कारवाई योग्य की अयोग्य या विषयी चौकशी केली जाईल. गरज पडल्यास पुन्हा एसआयटीनागपूर पोलिसांनी भूमाफियांसाठी एसआयटी स्थापित केली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक तक्रारी आल्या. त्यांच्या चार्जशिटही दाखल आहेत. एसआयटी ही परमनंट नव्हती. परंतु गरज पडल्यास पुन्हा एसआयटी स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधाकर देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७