शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलीस उभी करणार आता कोविड योद्ध्यांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:57 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या शहर पोलिसांनी आता कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची संकल्पना : कोविड योद्धे विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या शहर पोलिसांनी आता कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार शहरातील विविध भागात प्रत्येकी पाच नागरिक कोविड योद्धा म्हणून नियुक्त करणार आहेत. ते विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणार आहेत. या योद्ध्यांकडून सामाजिक जनजागरण करून घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जाहीर केले आहे.यासंबंधाने पोलीस आयुक्त उपाध्याय यांनी आज पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, लॉकडाऊन अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी आम्ही विविध जाती समुदायातील नागरिकांना सहभागी करून घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून जनजागरण करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, असा या योजनेमागचा उद्देश आहे.त्यानुसार आता प्रत्येक पोलीस ठाण्यात सहा ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर लावले जाणार आहे. एक पोलीस आणि एक नागरिक असे दोघे या ऑटोत बसून विविध झोपडपट्ट्या, गर्दीचे स्थान, बाजारपेठा, बँका आधी ठिकाणी ऑटो उभा करून लाऊडस्पीकरने जनजागृती करतील. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बीट (पथक) तयार करण्यात येईल. या बीटमध्ये पाच नागरिक नियुक्त केले जाणार असून त्यांना कोविड योद्धा म्हणून विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जाही दिला जाणार आहे. हे कोविड योद्धे त्यांच्या त्यांच्या समाजात जनजागरण करून नागरिकांना सामाजिक अंतर राखण्याचे आणि एकमेकांच्या संपर्कात न येण्याचे आवाहन करतील. कोविड योद्धे कोरोनाचे धोकेही समजावून सांगतील. योजने नुसार, या सर्वांना जवानांची कॅप आणि शिटीही दिली जाणार आहे.पहिल्या टप्प्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान ३० ते ३५ कोविड योद्धे नियुक्त केले जातील. त्यानंतर आवश्यकता भासल्यास आणखी वाढविण्यात येईल.सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून नागपूर शहराची देशात ओळख आहे. कोरोना ही एक लढाई आहे. ही लढाई आपण सर्व जण मिळून लढणार आहोत आणि कोरोनावर मात करणार आहोत.डॉ. भूषणकुमार उपाध्याय पोलीस आयुक्त, नागपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस