शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट व्हेरिफिकेशन प्रक्रियेत नागपूर पोलीस अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:59 IST

अवघ्या तीन दिवसात पासपोर्ट संबंधाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करून नागपूर पोलिसांनी पासपोर्ट तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सेवेत महाराष्टात अव्वलस्थान मिळवले आहे.

ठळक मुद्देअवघ्या तीन दिवसात चौकशी : अद्ययावत अ‍ॅपचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या तीन दिवसात पासपोर्ट संबंधाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करून नागपूर पोलिसांनी पासपोर्ट तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सेवेत महाराष्टात अव्वलस्थान मिळवले आहे.अर्जदारांना पासपोेर्ट तात्काळ उपलब्ध व्हावा म्हणून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून एम पासपोर्ट पोलीस अ‍ॅप हे एक मोबाईल अप्लीकेशन (अ‍ॅप) २०१७ मध्ये कार्यान्वित केले होते. या अ‍ॅपद्वारे केंद्रीय पारपत्र कार्यालय / पासपोर्ट सेवा केंद्र नागपूर येथे अर्जदाराने नोंद केल्यानंतर व्हेरिफिकेशनसह पुढची सर्व प्रक्रिया आॅनलाईन राबवून चौकशी अहवाल विहीत मुदतीत विभागीय पारपत्र कार्यालयात पाठविण्यात येतो. सध्यस्थितीत पोलीस आयुक्तालयात एम पासपोर्ट पोलीस अ‍ॅपचे काम १०० टक्के पेपरलेस करण्यात आले आहे. विदेशी मंत्रालयातर्फे २१ आॅगस्ट २०१७ ला नागपुरात पोलीस व्हेरिफिकेशन कार्यपध्दती संबधाने एक बैठक पार पडली. या बैठकीत १८ राज्यातील पासपोर्ट विभागाचे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पासपोर्ट चौकशीचा सरासरी कालावधी तेलांगणात ६ दिवस, आंध्रप्रदेश ९ दिवस, गुजरात ११ तर महाराष्ट्र ३९ दिवस असा होता. त्या मध्ये नागपूर शहराची नोंद २८ दिवसांची होती. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी कमीत कमी दिवसात ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आव्हान स्विकारले. त्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी आपल्या सहका-यांच्या माध्यमातून जानेवारी २०१८ मध्ये हा कालावधी ६ दिवसांवर आणला. जो महाराष्टात नागपूर पोलिसांनी अव्वलस्थानी पोहचवणारा ठरला.२७ मे २०१८ पासून परराष्ट्र मंत्रालयाने एम पासपोर्ट पोलीस मोबाईल अ‍ॅप्लीकेशन (अ‍ॅप) नवीन (अद्ययावत) स्वरूपात आणला आहे. त्यानुसार, आधीच्या तुलनेत चौकशीचे मुद्देही कमी करण्यात आले आहे. परिणामी नागपूर पोलिसांनी हा कालावधी आता २ ते ३ दिवसांवर आणून महाराष्ट्रात नागपूर पोलिसांची कार्यपद्धती पहिल्या क्रमांकावर आणल्याचा दावा पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आला आहे.

टॅग्स :passportपासपोर्टNagpur Policeनागपूर पोलीस