शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलिसांचा भोपाळमध्ये छापा, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 22:47 IST

नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक सेल) पथकाने भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये छापा घालून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. तेथून देशभरातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली.

 नागपूर, दि.  1 -  नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक सेल) पथकाने भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये छापा घालून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. तेथून देशभरातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली.धर्मेंद्रसिंग भरतसिंग राठोड (वय ३५) आणि  प्रियेश उपेंद्र तिवारी (वय २५, रा. नोएडा सेक्टर, ५३ ग्राम गिझोड, उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. राठोड  या गोरखधंद्याचा सूत्रधार असून,येथील साथीदारांच्या मदतीने गेल्या ८ महिन्यांपासून राठोड याने एमपीनगर, झोन दोन मधील रेमण्डच्या शोरूमजवळ बनावट कॉल सेंटर सुरू केले होते. रोजगार संकेतस्थळावर त्याने कॉल सेंटरची माहिती अपलोड केली होती. त्या माध्यमातून संपर्क साधणा-या बेरोजगाराना वेगवेगळळ्या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचा दावा तो करीत होता. त्यासाठी प्रारंभी काही रक्कम नोंदणीच्या नावाखाली तर नंतर व्हीजा, पासपोर्टच्या नावाखाली हजारोंची रक्कम उकळायचा. नंतर मात्र तो संबंधित बेरोजगाराला प्रतिसाद देत नव्हता. राठोडने आपल्या कॉल सेंटरमध्ये २० तरुणींना कर्मचारी म्हणून ठेवले होते. त्यांच्या माध्यमातूनच तो बेरोजगारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून रक्कम उकळत होता आणि त्यांची फसवणूक करीत होता. न्यू फुटाळा परिसरात राहणारा सतीश सुखराम बांते (वय ३४) यांच्याकडून राठोड आणि त्याच्या साथीधाराने अशाच प्रकारे ९४ हजार रुपये उकळले होते. राठोडने तक्रार नोंदवताच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेच्या (आर्थिक विभाग) उपायुक्त श्वेता खेडकर आणि  सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉलसेंटरचा छडा लावण्याची कारवाई सुरू झाली. 

तीन दिवस झाली शहानिशा

अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे, सायबर सेलचे सहायक निरीक्षक विशाल माने, उपनिरीक्षक शिवराज जमदाडे, उपनिरीक्षक पाटणकर, नायक सूर्या, हेमराज अश्विन आणि श्रीकांत यांचे पथक शुक्रवारी भोपाळला पोहचले. आरोपी आणि त्याच्या कॉलसेंटरची माहिती काढण्यात आली. शहानिशा झाल्यानंतर तेथील पोलिसांच्या मदतीने सोमवारी दुपारी या पथकाने कॉलसेंटरवर छापा मारला. यावेळी तेथून २ लॅपटॉप, ४२ मोबाईल, ८०  सीमकार्ड आणि बेरोजगाराच्या नोंदी असलेले रजिस्टर्ड जप्त केले. आरोपींना मंगळवारी नागपुरात आणण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे.