शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: प्रवाशांचा जीव वाचण्यासाठी चालकाचे दर्शनी भागात छायाचित्र, पोलिस व आरटीओची मोहीम

By सुमेध वाघमार | Updated: November 4, 2023 19:00 IST

Nagpur: समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा परिसरात १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २५ जीव गेले. या अपघातात बचावलेल्या बस चालकाच्या रक्तात 'अल्कोहोल'चे प्रमाण अधिक आढळले होते.

- सुमेध वाघमारे नागपूर : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा परिसरात १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २५ जीव गेले. या अपघातात बचावलेल्या बस चालकाच्या रक्तात 'अल्कोहोल'चे प्रमाण अधिक आढळले होते. या प्रकरणाला गंभीरतेने घेत ट्रॅव्हल्स चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांची तक्रार करणे सोपे होण्यासाठी आणि प्रवाशांचा जीव वाचण्यासाठी बसच्या दर्शनी भागात चालकाच्या छायाचित्रासह त्याचा भ्रमणध्वनी व वाहनाची माहिती लावणे बंधनकारक करण्यात आले.

'विदर्भ ट्रॅव्हल्स'ची ही बस नागपूरवरून पुण्याला समृद्धी महामागार्ने जात असताना पहाटे बस उलटून लागलेल्या आगीत प्रवासी होरपळून मरण पावले. आठ प्रवाशांना वेळीच बाहेर पडता आल्याने ते बचावले. यात बसचा चालक शेख दानिश शेख इस्माइल याचाही समावेश होता. या बसचालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करत अटक केली. न्यायवैद्यक चमूने त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असता ०.३० इतके अल्कोहोलचे प्रमाण आढळले होते. या प्रकरणानंतरही काही ट्रॅव्हल्स चालकांनी धडे घेतले नाहीत. मोबाइलवर संवाद साधणे, महिला प्रवाशांसोबत गैरवर्तनासह इतरही ब?्याच घटना घडल्या. सोशल मीडियावर नुकताच एका खासगी ट्रॅव्हल्सचा बसचालक वाहन चालवताना मोबाइलवर चित्रपट बघत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी नागपुरात शहर पोलिस, प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्तरीत्या एक अभिनव प्रकल्पावर काम करणे सुरू केले. त्यानुसार संबंधित ट्रॅव्हल्सच्या दर्शनी भागात बसचालकाचे छायाचित्र, त्याचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता आदी माहिती लावणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे कोणाला बसचालक किंवा बसमधील सोयीसुविधेची तक्रार असल्याने ते नावानिशी संबंधित यंत्रणेकडे करू शकतील. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल.

लवकरच ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीमपोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचननेुसार ट्रॅव्हल्स बसच्या दर्शनी भागात वाहन चालकासोबतच वाहनाच्या तपशिलाची माहिती लावणे बंधनकारक करण्यात आले. याच्या सूचना सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच या सर्वांची बैठक घेऊन, त्यांच्या समस्यांचे निराकरण करून तपासणी मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.-रवींद्र भुयार (उपप्रादेशिक परिवहन अधिकार) 

टॅग्स :nagpurनागपूर