शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  प्लास्टिकबंदीसाठी झोनस्तरावर पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:38 IST

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू केली आहे़ याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेवर आहे. बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती व कारवाईसाठी झोनस्तरावर पथक गठित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनपाची जनजागृती मोहीम : प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू केली आहे़ याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेवर आहे. बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती व कारवाईसाठी झोनस्तरावर पथक गठित करण्यात आले आहे. झोनस्तरावरील पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जाऊन दुकानदार, विक्रेते व नागरिकांना प्लास्टिक वापरू नका, असे आवाहन करण्यात येत आहे़ प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्या, थर्माकोल यासह सर्व प्लास्टिकच्या वस्तू वापरावर शासनाने बंदी घातल्याची माहिती दिली जात आहे.उद्योजक, विक्रेते व नागरिकांकडे असणाऱ्या प्लास्टिकच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत संबंधिताना माहिती देण्यासाठी महापालिकेतर्फे नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ तसेच प्लास्टिक गोळा करण्यासाठी महापालिकेच्या झोन कार्यालयांच्या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे़उद्योजक, विक्रेत्यांकडे प्लास्टिकचा साठा असल्यास त्यांना तो राज्याबाहेर विकता येईल किंवा महापालिकेच्या केंद्रावरही प्लास्टिकच्या वस्तू जमा करता येईल़ दरम्यान, व्यापारीवर्गाचा विरोध पाहता प्लास्टिकबंदीसंदर्भातील नियमांमध्ये शासनपातळीवर काही सुधारणा केल्या जाण्याची शक्यता आहे़ प्लास्टिकबंदीला मुदतवाढ मिळणार असल्याचीही चर्चा आहे़ मात्र, गेल्या महिन्यात शासनाने प्लास्टिकबंदीसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेनुसार नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने अंमलबजावणी सुरू केली आहे़ पहिल्या टप्प्यात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे़ याची जबाबदारी  झोनस्तरावरील पथकावर सोपविण्यात आली आहे.शासन निर्देशानुसार कार्यवाहीप्लास्टिकबंदीसंदर्भात जनजागृती केली जात आहे़ प्लास्टिक वापरू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे़ तर, जुन्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री व वापर करणाऱ्यांवर नियमित कार्यवाही केली जात आहे़ शासनाकडून पुढील दिशानिर्देश आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल़डॉ़ प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता), महापालिका

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMaharashtraमहाराष्ट्र