शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तलवारीच्या धाकावर पेट्रोलपंप लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 22:53 IST

Petrol pump Robbery, crime news Nagpur तलवारीच्या धाकावर तीन लुटारूंनी पेट्रोलपंप लुटला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : तलवारीच्या धाकावर तीन लुटारूंनी पेट्रोलपंप लुटला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.

यादवनगरात हा पेट्रोलपंप आहे. दिवसभराच्या पेट्रोल विक्रीची रक्कम मोजल्यानंतर स्रेहा अजय साखरे ही महिला कर्मचारी पंपाच्या कॅबिनमध्ये रक्कम जमा करायला जात असताना अचानक तीन लुटारू पेट्रोल पंपावर आले. त्यातील एकाने साखरे यांना तलवार लावून त्यांच्याजवळचे १६ हजार, ४२० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर शिवीगाळ करीत आरोपी त्यांच्या होंडा अ‍ॅक्टिव्हावर बसून सुसाट वेगाने पळून गेले. अचानक झालेल्या या घटनेमुळे पंपावरील कर्मचारी गोंधळले. त्यांनी आरडाओरड केली. नंतर यशोधरानगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंपावरच्या सीसीटीव्हीमधून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, स्रेहा साखरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

बाबा लंगड्याची टोळी जेरबंद यशोधरानगर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने शोधमोहीम राबविली. मोहम्मद जिशान उर्फ बाबा लंगड्या मोहम्मद खलील शेख (वय २१), आरिफ अली लियाकत अली (वय २७)आणि सूर्या बाबूराव जांभूळकर (वय १९) या तिघांनी हा गुन्हा केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना वनदेवीनगरातील रेल्वेपुलाखाली पकडले. दारूत उडवली रक्कम आरोपींनी पेट्रोल पंप लुटल्यानंतर ओली पार्टी केली. दारू आणि जेवणात आठ हजार रुपये उडवले. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ८,०४० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमाकांत दुर्गे, सहायक निरीक्षक श्रीनिवास दराडे, प्रकाश काळे, विनोद सोलव, नायक मधुकर निखाडे, विजय लांजेवार, आफताब शेख, रत्नाकर सोनटक्के यांनी ही कामगिरी बजावली. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपRobberyचोरी