शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नागपुरातील पेट्रोल पंप दरोडा, खून प्रकरण : उत्कृष्ट तपासासाठी पोलिसांना एक लाखाचा रिवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 21:17 IST

रोकड लुटण्याच्या इराद्याने पेट्रोल पंपावर दरोडा घालून एकाची हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी करणारा खतरनाक गुन्हेगार सागर बावरी अजूनही फरार आहे. दरम्यान, कोणताही धागा हातात नसताना या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात छडा लावून सहापैकी पाच आरोपींना अटक करण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावणारे एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि त्यांच्या पथकाला पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक लाख रुपयांचा कॅश रिवॉर्ड आणि प्रमाणपत्र शनिवारी जाहीर केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोकड लुटण्याच्या इराद्याने पेट्रोल पंपावर दरोडा घालून एकाची हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी करणारा खतरनाक गुन्हेगार सागर बावरी अजूनही फरार आहे. दरम्यान, कोणताही धागा हातात नसताना या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात छडा लावून सहापैकी पाच आरोपींना अटक करण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावणारे एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि त्यांच्या पथकाला पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक लाख रुपयांचा कॅश रिवॉर्ड आणि प्रमाणपत्र शनिवारी जाहीर केले आहे.गुरुवारी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान हिंगणा येथील खतरनाक गुन्हेगार सागर बावरी याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने हिंगणा एमआयडीसी परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा घातला होता. पंपावरचे कर्मचारी पंढरी श्रीरामजी भांडारकर (वय ६१, रा. वैभवनगरी, वानाडोंगरी) आणि लीलाधर मारोतराव गोहते ( वय ५३, पूजा ले-आऊट, जयताळा) या दोघांवर कुख्यात बावरीने कुº­हाडीचे घाव घातले होते. त्यामुळे भांडारकर जागीच गतप्राण झाले तर गोहते अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या आणि पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. कोणताही पुरावा हाती नसताना त्यांनी अवघ्या २४ तासात या दरोड्याचा पर्दाफाश करून कुख्यात बावरीसोबत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाच आरोपींना अटक केली. बावरी अद्याप फरार आहे अटक करण्यात आलेल्या पैकी अक्षय जाधव अरुण पाल आणि राहुल सुरेश राऊत या तिघांना कोर्टात हजर करून त्यांचा पोलिसांनी २७ मे पर्यंत पीसीआर मिळवला. या गुन्ह्याचा सूत्रधार बावरी मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान गुन्ह्याशी संबंधित कोणताही धागादोरा हातात नसताना उत्कृष्टपणे तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी एमआयडीसी पोलिसांना एक लाख रुपयांचा कॅश रिवॉर्ड जाहीर केला आहे.आरोपीची बनवाबनवीया गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी राहुल राऊत हा पोलिसाशी डावबाजी खेळला. आपले वय १७ वर्षे ८ महिने आहे असे सांगून, त्याने बालगुन्हेगार म्हणून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला फारशी विचारपूस केली नाही. मात्र त्याची कागदपत्रे तपासली असता तो १८ वर्षे ८ महिने वयाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक करून न्यायालयात सादर केले.

टॅग्स :PoliceपोलिसPetrol Pumpपेट्रोल पंपMurderखून