शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

नागपूरकर कौशिकी ठरली ‘मिस परफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:49 IST

‘मिस इंडिया मिस सुपर टॅलेंट सीझन-९’ ही सौंदर्य स्पर्धा बेंगळुरूजवळील दावणगिरे येथे नुकतीच पार पडली.

ठळक मुद्देमानाचा तुरा : ब्युटी, वॉक, टॅलेंट, जनरल नॉलेज सर्वच आघाड्यांवर सरस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मिस इंडिया मिस सुपर टॅलेंट सीझन-९’ ही सौंदर्य स्पर्धा बेंगळुरूजवळील दावणगिरे येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नागपूरच्या कौशिकी नाशिककर हिने संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या १५ स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस परफेक्ट’ हा अवॉर्ड जिंकला. १८ ते २५ या वयोगटासाठी असलेल्या या स्पर्धेत कौशिकी ही १८ वर्षांची एकमेव स्पर्धक होती. परंतु तिने आपले सौंदर्य व विद्वत्तेच्या बळावर सर्व परीक्षकांना प्रभावित करीत या अवॉर्डवर आपले नाव कोरले. नागपूरकरांसाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. कौशिकी ही दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शाखेच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील स्वत: फॅशन कोरिओग्राफर आहेत. ते वर्धा रोडवरील हिंदुस्थान कॉलनीत राहतात. आपल्या मुलींने सौंदर्य स्पर्धेत नाव कमवावे, अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी कौशिकी अडीच वर्षांची असताना तिला पहिल्यांदा रॅम्पवर उतरविले. अडीच वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या या पूर्ण प्रवासात कौशिकीने नागपूर क्वीन, मिस भंडारा, मिस महाराष्ट्र आयकॉन अशा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले. मिस इंडिया मिस सुपर टॅलेंट या स्पर्धेचे मोठे आव्हान होते. या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी ती एकमेव स्पर्धक होती.इतर स्पर्धकांच्या तुलनेत तिला फारसे कोचिंग लाभले नव्हते. वडिलांनी दिलेल्या प्रशिक्षणाच्या बळावरच ती या स्पर्धेसाठी सज्ज झाली होती. आपण जिंकायचेच या आत्मविश्वासासह ती स्पर्धेला सामोरी गेली आणि ब्युटी, वॉक, टॅलेंट, जनरल नॉलेज सर्वच आघाड्यांवर प्रशिक्षकांना प्रभावित करीत तिने ‘मिस परफेक्ट’चा मुकुट मिळवला. या यशामुळे तिचा उत्साह द्विगुणित झाला असून, आता मिस फेमिना जिंकण्यासाठी तिने तयारी सुरू केली आहे.