शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ई-पंचनाम्याचा नागपूर पॅटर्न, शेतीच्या नुकसानीची मिळते अचूक माहिती

By जितेंद्र ढवळे | Updated: September 14, 2023 16:51 IST

सरकारला अहवाल सादर : जिल्ह्यात १ हजार १८५ हेक्टर क्षेत्र बाधित 

नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि गतीने पंचनामे व्हावे यासाठी नागपूर विभागात राबविण्यात आलेला ई-पंचनाम्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यावर्षी जून ते जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राचे ई-पंचनामे करुन राज्य सादर करण्यात आले आहेत. या प्रयोगाचा अहवाल सरकारला सादर करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरुवारी दिली.

महसूल सप्ताहानिमित्त नागपूर विभागात ‘ई पंचनामे’ हा प्रयोग प्रथमच राबविण्यात आला होता. नागपूरसह विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे या प्रयोगाच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत. मोबाईल अप्लीकेशन व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी नुकसानी संदर्भातील माहिती व छायाचित्र अपलोड केले. यानंतर तहसिलदार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यामार्फत केवळ दहा दिवसात अचूक माहिती सरकारला सादर करणे शक्य झाले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूर जिल्ह्याची माहिती विभागीय आयुक्त यांना या सॉफ्टवेअरमार्फत सादर केल्यानंतर केवळ पाच मिनिटात ही माहिती शासनाला सादर करणे सुलभ झाले बिदरी यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात कोरडवाहू, बागायत तसेच फळ पिकाखालील क्षेत्रापैकी १ हजार १८५.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ हजार ४८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांचे १ कोटी ३५ लाख ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे ७३ हजार १६० हेक्टर क्षेत्र बाधित

नागपूर विभागात जुन व जुलै या कालावधीत अतिवृष्टीमुळे ७३ हजार १६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात १ लाख १ हजार ७६ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. झालेल्या नुकसानीसाठी ६३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकnagpurनागपूर