शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑक्सिजन १५३८ तर, आयसीयूचे १९८ बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 22:32 IST

Oxygen , ICU beds are empty एप्रिल महिन्यात कोरोनाचा गंभीर रुग्णांनाही ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण झाले होते. मेयो व मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये एका बेडवर दोघांना ठेवण्याची वेळ आली होती; परंतु आता चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र : व्हेंटिलेटरचे बेड वाढविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोनाचा गंभीर रुग्णांनाही ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण झाले होते. मेयो व मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये एका बेडवर दोघांना ठेवण्याची वेळ आली होती; परंतु आता चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. मागील नऊ दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने ऑक्सिजनच नव्हे तर आयसीयूचे बेड रिकामे राहू लागले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचे १५३८ तर आयसीयूचे १९८ बेड रिकामे होते; परंतु व्हेंटिलेटरचे चारच बेड शिल्लक असल्याने ते वाढविण्याची गरज आहे.

नागपूर शहरात १५२ खासगी हॉस्पिटल, १४ शासकीय तर १६ कोविड केअर सेंटरमधून कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात. खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे २७३६, आयसीयूचे १७४४ तर व्हेंटिलेटरचे ३५३ बेड आहेत. तर, शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचे २११७, आयसीयूचे ५२३ तर व्हेंटिलेटरचे २२७ बेड आहेत. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे ९२६, आयसीयूचे १९६ तर व्हेंटिलेटरचे ४ बेड रिकामे होते. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचे ५२०, आयसीयूचे २ तर व्हेंटिलेटरचा एकही बेड रिकामा नव्हता. कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचे ९२ बेड रिकामे होते.

आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची कमी

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची मोठी कमतरता दिसून आली. सध्याच्या स्थितीत शासकीय व खासगी मिळून आयसीयूचे २,२६७ तर व्हेंटिलेटरचे ५८० बेड आहेत; परंतु ४ हजारावर रुग्णसंख्या जाताच हे बेड फुल्ल होतात. सध्या तिसऱ्या व चवथ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने या दोन्ही बेडमध्ये वाढ होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल