शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर मिळणार नागपुरी संत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 11:02 IST

नागपूरच्या संत्र्यांला जागतिक बाजारपेठ मिळावी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संत्रा थेट ग्राहकापर्यंत पोहचावा, यासाठी महाआॅरेंजने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेल्या पहिल्या संत्रा फळ विक्री केंद्राचा शुभारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाला.

ठळक मुद्देमहाआॅरेंजचे संत्रा विक्री केंद्र केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या संत्र्यांला जागतिक बाजारपेठ मिळावी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संत्रा थेट ग्राहकापर्यंत पोहचावा, यासाठी महाआॅरेंजने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेल्या पहिल्या संत्रा फळ विक्री केंद्राचा शुभारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाला.नितीन गडकरी म्हणाले, प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सहजपणे विमानतळावरच संत्रा उपलब्ध झाल्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी संत्रा आकर्षक संवेष्टनात तसेच उत्तम दर्जाचे संत्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महाआॅरेजला दिल्या.नागपूरचा संत्रा अत्यंत उत्तम दर्जाचा असूनही केवळ निर्यात नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाआॅरेजच्या माध्यमातून कारंजा घाडगे येथील संत्रा निर्यात सुविधा केंद्राला मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या संस्थेमार्फत नागपुरी संत्र्याची निर्यात बांग्लादेश, श्रीलंका, दुबई, कतार आदी देशात केली. दुबईसह इतर देशात संत्र्याला मागणी वाढत आहे. नागपूर येथून दुबईसाठी कार्गोने संत्रा दररोज पाठविण्यात येत असून मागणी वाढत असल्याचे महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. महाआॅरेंजच्या माध्यमातून हवाई मार्गाने नागपूर विमानतळावरुन बहरीन, कतार, दुबई इत्यादी देशात संत्रा पाठविण्यात आला असून तेथून पुन्हा मागणी आलेली आहे. या वेळी श्रीधर ठाकरे, रवी बोरटकर, मनोज जवंजाळ, प्रशांत कुकडे, अशोक धोटे, एन.आर.सीसीजी संचालक मिलिंद लदानिया, अतिरिक्त विभागीय आयुक्त रवींद्र ठाकरे, राहुल ठाकरे, मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ संचालक विजय मुळेकर, आबीद रूही, एम.ए. आनंद तसेच संत्रा निर्यातदार संदीप चव्हाण, सुधीर देऊळगावकर, समीर कुबडे, चैतन्य इंगळे, अजय कडू आदी शेतकरी उपस्थित होते.

लोकमतच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे फलितडिसेंबर २०१७ मध्ये लोकमतने वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. त्यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरी संत्रा विदेशात नेण्याची घोषणा केली होती. गडकरी यांच्या घोषणेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली होती. महाआॅरेंजचे विमानतळावर सुरू झालेले संत्रा विक्री केंद्र हे लोकमतच्या पुढाकाराचे फलित आहे.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल