शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रभु रामाच्या रथ मार्गावर अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:45 IST

राम जन्मोत्सवाच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरातून प्रभू रामाची शोभायात्रा निघते. या शोभायात्रेची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शोभायात्रा जाणाऱ्या मार्गांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी रस्ता बंद आहे तर कुठे मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्दे रस्त्यांची दुर्दशा : खड्डे व मातीचे ढिगारे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राम जन्मोत्सवाच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरातून प्रभू रामाची शोभायात्रा निघते. या शोभायात्रेची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शोभायात्रा जाणाऱ्या मार्गांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी रस्ता बंद आहे तर कुठे मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.नागपूरची ही शोभायात्रा देशात प्रसिद्ध आहे. ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शोभायात्रेच्या मार्गात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी यात्रेच्या मार्गात नादुरुस्त रस्त्यांच्या अडथळा आहे. असे असले तरी प्रशासनाने मौन धारण केले आहे. ‘लोकमत’ने शोभायात्रेच्या मार्गाची पाहणी केली असता अनेक अडथळे दिसून आले. पोद्दारेश्वर श्री राम मंदिराच्या समोरील रस्ता अद्यापही पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेला नाही. मेयो हॉस्पिटल चौकात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. ज्या जागेवरून शोभायात्रा जुन्या भंडारा रोडकडे वळते ती जागा बंद करण्यात आली आहे. मेयोच्या प्रवेशद्वारासमोर काही जागा मोकळी आहे. तेथून शोभायात्रा काढताना बऱ्याच अडचणी येतील.आग्याराम देवी चौकाची पूर्णपणे दूरवस्था झाली आहेय येथील रस्त्यावर डांबरीकरणही करण्यात आलेले नाही. कॉटन मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजुचे सिमेंटकरणाचे काम बंद पडले आहे. कॉटन मार्केट चौकातही अशीच स्थिती आहे. येथेही मेट्रोच्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. आनंद टॉकीज चौकात मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे येथे आधीच वाहतुकीची कोंडी होते. मुंजे चौकात तर याहूनही वाईट चित्र आहे. येथेही बांधकामासाठी रस्ता अरुंद करण्यात आला आहे. या मार्गावरून शोभायात्रा काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा