शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नागपुरात मालमत्तांची संख्या वाढली पण वसुली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:59 IST

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहरातील मालमत्तांचे सायबरटेक कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील मालमत्तांची संख्या ६.५० लाखापर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कर व कर आकारणी विभागाच्या नोंदीनुसार अजूनही ५.६७ लाख मालमत्तांवर कर आकारणी केली जात आहे. सर्वेक्षणात मालमत्तांची संख्या वाढली पण जुन्याच मालमत्तावर कर आकारणी होत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कर वसुलीत फारशी वाढ झालेली नाही.

ठळक मुद्देमनपाचे उत्पन्न कसे वाढणार : सर्वेक्षणानंतरही जुन्याच ५.६७ लाख मालमत्तांवर कर आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहरातील मालमत्तांचे सायबरटेक कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील मालमत्तांची संख्या ६.५० लाखापर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कर व कर आकारणी विभागाच्या नोंदीनुसार अजूनही ५.६७ लाख मालमत्तांवर कर आकारणी केली जात आहे. सर्वेक्षणात मालमत्तांची संख्या वाढली पण जुन्याच मालमत्तावर कर आकारणी होत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कर वसुलीत फारशी वाढ झालेली नाही.सर्वेक्षणामुळे मालमत्तांची संख्या वाढणार असल्याचे गृहित धरून वित्त वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापासून ५०९ कोटींचे उत्पन्न गृहित धरण्यात आले होते. परंतु १ एप्रिल ते २२ आॅक्टोबर २०१८ या साडेसहा महिन्यात विभागाची वसुली जेमतेम ९३ कोटी ३३लाख ३ हजार ९५५ इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७८ कोटी ३९ लाख ६१ हजार १५९ इतकी झाली होती. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा जेमतेम १४.५० कोटींनी वाढ झाली आहे.वसुलीत धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, आशीनगर व सतरंजुपीरा असे पाच झोन माघारले आहेत. त्या तुलनेत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, लकडगंज व मंगळवारी झोनची वसुली अधिक आहे. लक्ष्मीनगर झोनची सर्वाधिक १४.८८ कोटींची वसुली असून त्यापाठोपाठ धरमपेठ झोनची १२.४२ कोटी तर लकडगंज व मंगळवारी झोनची वसुली ११ कोटीहून अधिक आहे. हनुमाननगर झोनची वसुली १०.४५ कोटी आहे.सतरंजीपुरा झोन वसुलीत माघारला आहे. या झोनची वसुली फक्त ३ कोटी २० लाख इतकी आहे. गांधीबाग झोन ४.४६, नेहरुनगर ७.६१, तर धंतोली झोनची वसुली ५.८७ कोटी आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी मालमत्ता कराची वसुली केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाकडून वसुलीवर लक्ष केंद्रित केल्याचा दावा केला जात असूनही असतानाही अपेक्षित वसुली होत नसल्याचे चित्र आहे.नवीन मालमत्ता कुठे गेल्या?सर्वेक्षणात लाखाहून अधिक नवीन मालमत्तांचा शोध घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मालमत्तांची संख्या वाढल्याने वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र नवीन मालमत्ता अद्याप कर व कर आकारणी विभागाच्या रेकॉर्डला आलेल्या नाहीत. परिणामी, त्यांना अद्याप डिमांड न पाठविल्याने या मालमत्ता कुठे गेल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर