शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नागपूर मनपाला सांडपाण्यापासून मिळणार ३३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:50 IST

नागपूर महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको ) आणि खासगी आॅपरेटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार दररोज १५० एमएलडी व ५० एमएलडीचे प्रकल्प सुरू होत आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला ३३ कोटींचा महसूल जमा होणार आहे.

ठळक मुद्दे१५० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया : सिंचनाच्या पाण्याची बचत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको ) आणि खासगी आॅपरेटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार दररोज १५० एमएलडी व ५० एमएलडीचे प्रकल्प सुरू होत आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला ३३ कोटींचा महसूल जमा होणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून महाजेनकोच्या मौदा व खापरखेडा येथील वीज प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे भांडेवाडी येथील महापालिकेच्या १३० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून कोराडी येथील वीज निर्मिती प्रकल्पाला पुरविल्या जाते . यातून महापलिकेला वर्षाला १५ कोटी मिळतात. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या माध्यमातुन महापालिकेच्या तिजोरीत ४५ ते ५० कोटी जमा होणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.कोराडी, खापरखेडा व मौदा येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचा वापर केला जातो. याचा सिंचनवर परिणाम होतो. परंतु आता वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. यातून पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. दुसरीकडे महापालिकेलाही या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पातून वीज प्रकल्पांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा यासाठी वापर केला जाणार असल्याने पाण्याच्या बचतीसोबतच खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा विश्वास मुदगल यांनी व्यक्त केला.दूषित पाण्याची समस्या मार्गीशहरातील सांडपाणी नागनदीत सोडले जाते. पुढे ते गोसेखुर्द प्रकल्पाला जाऊन मिळते. यामुळे नदीकाठावरील गावांतील भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी दूषित होत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे. परंतु आता ३३० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार असल्याने दूषित पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर