शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपात तिकीट मशीन खरेदीचा घोटाळा गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:19 IST

महापालिकेच्या परिवहन समितीचा कुठलाही प्रस्ताव नसताना, तसेच परिवहन विभागाने कुठल्याही निविदा न काढता शहर बससाठी ८०० इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आली होती. तब्बल दोन कोटींच्या या ईटीएम मशीनच्या खरेदीत घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देनिविदा न काढताच खरेदी : सभागृहात चर्चेसाठी प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीचा कुठलाही प्रस्ताव नसताना, तसेच परिवहन विभागाने कुठल्याही निविदा न काढता शहर बससाठी ८०० इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आली होती. तब्बल दोन कोटींच्या या ईटीएम मशीनच्या खरेदीत घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप संबंधितावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेत कुठलीही खरेदी करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्थायी समितीची मान्यता घेऊन निविदा काढल्या जातात. पण परिवहन विभागासाठी इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची खरेदी करताना कुठलेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. परिवहन विभागाने परस्पर मुंबई येथील एका कंपनीकडून या ईटीएम मशीन्स खरेदी केल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची शक्यता असल्याचा आरोप नगरसेवक संदीप सहारे यांनी केला असून, याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहेत.नागपूर मनपाने शहर परिवहन बससाठी नियमबाह्य पद्धतीने ८०० ईटीएम मशीन्स खरेदी केल्या. विशेष म्हणजे जुन्या ६०० मशीन्स असताना नवीन मशीन्सची खरेदी करण्यात आली. भविष्यात नागपूर मेट्रो आणि स्टार बससाठी एकच कार्ड असणार आहे. असे असतानाही नव्या ८०० ईटीएम खरेदीचा उद्देश काय होता, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.या प्रकरणामुळे आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या नागपूर महापालिकेला मात्र मोठे नुकसान सहन करावे लागले. नियमाने निविदा काढून या मशीन्सची खरेदी झाली असती तर कंत्राटदारांमध्ये स्पर्धा वाढून महापालिकेच्या पैशांची बचत झाली असती, अशी चर्चा नगरसेवक करीत आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfraudधोकेबाजी