शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:47 IST

पुढील शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ जून रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. यासाठी शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देशिक्षण समितीचा निर्णय : नियोजन करण्याचे सभापती दिलीप दिवे यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ जून रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. यासाठी शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सोमवारी दिले. यासंदर्भात महापालिका मुख्यालयातील सभागृहात शिक्षण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी मागील वर्षी डी.बी.टी कार्ड तयार करण्यात आलेले होते. यावषीर्ही तीच प्रणाली राबविण्यात यावी. तसेच जे विद्यार्थी नव्याने प्रवेश घेणार आहेत त्यांचे डी.बी.टी. कार्ड तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात यावी. गणवेशाचे आठ-दहा नमुने येत्या चार-पाच दिवसात सादर करण्याचे निर्देश दिलीप दिवे यांनी दिले.पूर्व माध्यामिक वर्गाच्या इंग्रजी माध्यमाची नर्सरी व केजी वन, केजी टू ची पुस्तके निवड करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. त्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात यावी, असे दिवे यांनी निर्देशित केले.महापालिका शाळेत बायोमॅट्रिक सिस्टिम लावण्याबाबत मंजुरी मिळली आहे. त्याबाबत निविदा तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करा. सेवाज्येष्ठता यादी तयार क रताना जे शिक्षक निवृत्त झाले आहे त्यांची नावे त्या यादीतून वगळून सुधारित यादी तयार करून प्रकाशित करा, असे आदेश दिवे यांनी दिले. विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक आणि पिण्याच्या पाण्याच्या देयकाबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपसभापती भारती बुंडे, सदस्या रिता मुळे, स्वाती आखतकर, प्रमिला मंथरानी, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, नितीन साठवणे, मनोज गावंडे, मो. इब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अतिरिक्त सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा