शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपात पदोन्नती घोटाळा; चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 20:24 IST

महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर नाही. विभागांची सेवाज्येष्ठता यादी नाही. ज्यांच्याकडे पदवी नाही अशांच्या सेवापुस्तिकेत पदवीधारक असल्याबाबतची नोंद करून पदोन्नती देण्याचे प्रकार सुरू आहे. नियम डावलून प्रकार सुरू आहेत. यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप मंगळवारी सर्वसाधारण सभेत क रण्यात आला. यावर अतिरिक्त आयुक्तामार्फत चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्तावर जबाबदारी : पुढील सभागृहात अहवाल मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर नाही. विभागांची सेवाज्येष्ठता यादी नाही. ज्यांच्याकडे पदवी नाही अशांच्या सेवापुस्तिकेत पदवीधारक असल्याबाबतची नोंद करून पदोन्नती देण्याचे प्रकार सुरू आहे. नियम डावलून प्रकार सुरू आहेत. यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप मंगळवारी सर्वसाधारण सभेत क रण्यात आला. यावर अतिरिक्त आयुक्तामार्फत चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होताच भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनी शिप्ट अभियंता यांना कनिष्ठ अभियंता पदात समायोजित करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. शासनाचे पदोन्नतीचे नियम आहेत. महापालिकेत सभागृहाच्या मंजुरी घेऊ न पदोन्नती देण्याची अनेक प्रकरणे आहेत. मग शिफ्ट अभियंता यांच्यावर अन्याय का, असा सवाल होले यांनी केला. पदोन्नतीत घोटाळा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.उपायुक्त महेश धामेचा यांनी पदोन्नतीची यादी वेबसाईटवर प्रकाशित के ली जात असल्याची माहिती दिली. परंतु यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. पदोन्नतीचा प्रश्न गंभीर असल्याने या प्रकणाची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत करून पुढील सभागृहात याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केली. महापौरांनी त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले तसेच नगरसेवकांना यासंदर्भात सात दिवसात तक्रारी द्याव्यात असे त्यांनी आवाहन केले.महाराष्ट्रात कोणत्याही महापालिकेत शिफ्ट इंजिनिअरचे पद नाही. मात्र नागपूर महापालिकेत या पदावर भरती घेण्यात आली आहे. अशा आयटीआय उत्तीर्ण असलेल्यांना अभियंता पदावर पदोन्नती देण्याची सूचना नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केली.अखेर साबळे यांचा राजीनामाकाँग्रेसच्या कोट्यातून तीन नगरसेवक स्थायी समितीवर जातात. त्यानुसार दिनेश यादव व गार्गी चोपडा यांनी निवड करण्यात आली होती. मात्र एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असल्याने हर्षला साबळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यांचे पती मनोज साबळे यांनीही राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु स्थायी समितीवरील नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याने अखेर साबळे यांनी समितीचा राजीनामा दिला. विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौरांकडे त्यांचा राजीनामा सोपविला. त्यांच्या रिक्त जागेवर कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे.बसपाचे बुर्रेवार यांची वर्णीबसपाच्या कोट्यातून स्थायी समितीवर एका सदस्यांची नियुक्ती केली जाते. मंगला लांजेवार यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी इब्राहिम टेलर यांची निवड होणार असल्याची कालपर्यंत चर्चा होती. मात्र सभागृहात अचानक संजय बुर्रेवार यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीत बुर्रेवार यांना भाजपाने उमेदवारी न दिल्याने ते बसपाच्या तिकिटावर निवडून आले होते.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार