शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ‘आपली बस’चा मनपाच्या तिजोरीवर अधिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:11 IST

शहरातील नागरिकांची सुविधा विचारात घेता,‘ना नफा ना तोटा’या धर्तीवर ‘आपली बस’ चालविण्याचा महापालिकेचा मानस असला तरी, सध्याची परिस्थिती विचारात घेता आपली बसचा तोटा कमी होण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्देतोटा कमी करण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नागरिकांची सुविधा विचारात घेता,‘ना नफा ना तोटा’या धर्तीवर ‘आपली बस’ चालविण्याचा महापालिकेचा मानस असला तरी, सध्याची परिस्थिती विचारात घेता आपली बसचा तोटा कमी होण्याची शक्यता नाही. उलट बसेसची संख्या वाढल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढणार आहे.शहर बससेवेची जबाबदारी चार आॅपरेटरवर सोपविण्यात आली आहे. यात तीन रेड बस आॅपरेटर एक ग्रीन बस आॅपरेटरचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत रेड बस आॅपरेटरचे महापालिकेकडे २७.२२ कोटी रुपये थकबाक ी आहे. थकबाकीसाठी गेल्या गुरुवारी बस आॅपरेटरने अचानक संप पुकारला होता. शहरातील बसेस तीन तास ठप्प होत्या. काही वेळात महापालिका प्रशासनाने १.५० कोटी रु. देण्याची ग्वाही दिल्यानंतर बसेस सुरू झाल्या. परंतु यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.अचानक बससेवा ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. बस आॅपरेटर कंपन्यांपैकी हंसा आॅपरेटर कंपनीचे ९ कोटी ६७ लाख, ट्रॅव्हल टाइम कंपनीचे ९ कोटी तर आऱ के़ सिटीबस आॅपरेटरचे ९ कोटी ०५ लाख रुपये महापालिकेकडे थकीत आहेत़ यासाठी संपाचे हत्यार उगारले होते. गेल्या वर्षभरापासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशापरिस्थितीत दर महिन्याला पाच ते सात कोटींचा आर्थिक भार महापालिकेवर पडत आहे.करारानुसार तीन रेड बस आॅपरेटरला ४८७ बसेस चालवायच्या आहेत. सध्या शहरातील रस्त्यांवर ३७५ बसेस धावत आहेत, म्हणजेच अजूनही २५ टक्के बसेस कमी आहेत. सर्व बसेस सुरू होण्यासोबतच तोटाही वाढणार आहे. यामुळे दर महिन्याला महापालिकेला सात ते आठ कोटींचा बोजा सहन करावा लागणार आहे.नागपूर शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. मेट्रोच्या सेवेला महापालिकेची बससेवा पूरक असली पाहिजे, तरच शहरातील नागरिक आपली बसमधून प्रवास करतील व शहरातील रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल. आपली बस तिकिटापासून महापालिकेला मिळणाºया उत्पन्नाच्या तुलनेत खर्च दुप्पट आहे. शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगर परिवहन लिमिटेड(एनएमपीएल)ने महापालिकेला १०८ कोटी व इस्रो खाते उघडण्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती; परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा निधी मिळालेला नाही.बससेवा सक्षम करण्याचा प्रयत्नकोणत्याही शहरातील बससेवा नफ्यात नाही. परंतु होणारा तोटा कमी कसा करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. मासिक खर्चात कपात केली आहे. उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. बससेवा सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.शिवाजी जगताप, परिवहन व्यवस्थापक महापालिका

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका