शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा नागपूर मनपात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 20:08 IST

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दशहतवाद्यांच्या ठिकाणावर बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जल्लोष होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर महाल येथील महापालिकेच्या टाऊ न हॉलसमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी बॅन्ड पार्टीच्या गाण्यावर नाचून एकच जल्लोष केला. सैराट चित्रपटाच्या गाण्यावर नगरसेवकांनी ताल धरला.

ठळक मुद्देसैराटच्या गाण्यावर नगरसेवक थिरकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दशहतवाद्यांच्या ठिकाणावर बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जल्लोष होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर महाल येथील महापालिकेच्या टाऊ न हॉलसमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी बॅन्ड पार्टीच्या गाण्यावर नाचून एकच जल्लोष केला. सैराट चित्रपटाच्या गाण्यावर नगरसेवकांनी ताल धरला.महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे भावी अध्यक्ष प्रदीप पोहाणे, बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल, बाल्या बोरकर, महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील, क्रीडा सभापती नागेश सहारे, विधी सभापती धर्मपाल मेश्राम, झोन सभापती प्रकाश भोयर, रिता मुळे, पिंटू झलके, दीपक चौधरी यांच्यासह पदाधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवक यात सहभागी झाले होते.मदतनिधीसाठी नगरसेवक देणार २-२ हजारमहापौरांनी सभागृहात जल्लोषाची घोषणा करताच काँग्रेसचे नगरसेव हरीश ग्वालबंशी यांनी पुलवामा येथील घटनेतील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून नगरसेवकांनी प्रत्येकी एक हजार देण्याचा प्रस्ताव मांडला. याचे सर्व नगरसेवकांनी समर्थन केले. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनीही या प्रस्तावाचे समर्थन करीत एक हजाराऐवजी प्रत्येकी दोन हजार देण्याची सूचना केली. याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका