शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना हाय व्होल्टेज तारेला स्पर्श; वेकोली बंकर परिसरात बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 23:37 IST

सिल्लेवाडा काेळसा खाण आवारातील घटना

नागपूर (खापरखेडा) : वेकाेली काेळसा खाणीच्या बंकर परिसरातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर मित्रांसाेबत खेळताना नऊ वर्षीय बालकाचा जवळच असलेल्या विजेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित असला तरी मुले या परिसरात राेज खेळतात. याकडे वेकाेली प्रशासनाचे मुळीच लक्ष नसते. ही दुर्दैवी घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा काेळसा खाण परिसरात मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

नक्ष चंद्रपाल साेनेकर (९, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. नक्ष आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून, सिल्लेवाडा येथील शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हाेता. वेकाेलीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बंकर क्रमांक-५ परिसरात एका रांगेत रेतीचे २५ ते ३० फूट उंच ढिगारे आहेत. त्यावर चढणे व घसरत खाली येणे मुलांसाठी आनंददायी असल्याने रेतीचे ढिगारे त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. यातील काही ढिगाऱ्यांवरून व जवळून विजेच्या हाय व्हाेल्टेज तारा गेल्या आहेत. काही ढिगारे तारांपेक्षाही उंच आहेत.नक्ष त्याच्या पाच समवयस्क मित्रांसाेबत या ढिगाऱ्यावर राेज खेळायला जायचा. यातील एका ढिगाऱ्यावर खेळत असताना त्याचा हाय व्हाेल्टेज तारेला स्पर्श हाेताच क्षणभरात त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी घराच्या दिशेने पळ काढला. माहिती मिळताच कुटुंबीयांसह पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून वेकाेली प्रशासनाने नक्षच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरेे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्हमुळात हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही. घटनास्थळापासून १०० मीटरवर प्रवेशद्वार असून, तिथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. असे असताना मुले राेज या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळायला यायची. त्यांना आजवर एकाही सुरक्षारक्षकाने आत येण्यास प्रतिबंध केला नाही. सुरक्षारक्षकांनी मुलांना आत येऊ दिले नसते तर नक्षचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे वेकाेलीच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.