शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:17 PM

रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या.

ठळक मुद्देनादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात : मनपाचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी स्कुटीस्वार तरुणी गंभीर जखमी झाली. दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या आपली बसेसची देखभाल, दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट असून यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.बस बंद पडण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे ब्रेक फेल होण्याच्या घटना घडत आहे. यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असूनही परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.महापालिकेने शहर बससेवेसाठी तीन ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडेच आपली बसच्या देखभाल व दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. परंतु त्याकडे ऑपरेटरचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज अचानक बस बंद पडणे, ब्रेक फेल सारख्या घटना होत आहेत. या महिन्यात महापालिका परिवहन विभागाकडील नोंदीनुसार ९४१ ठिकाणी विविध कारणाने रस्त्यांवरच बस बंद पडली, अर्थात दररोज वेगवेगळ्या मार्गावर ३१ ठिकाणी बस अचानक बंद पडत आहे किंवा ब्रेक फेल होत आहेत. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर, या सहा महिन्यात ४ हजार ८५४ ठिकाणी बस अचानक बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.जुनमध्ये ७०९ जुलैमध्ये ८६१ आणि ऑगस्टमध्ये ९१० ठिकाणी विविध रस्त्यांवर बस अचानक बंद पडल्या. त्यामुळे तिकिटसाठी पैसे खर्च करूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरात दररोज दीड लाख प्रवासी 'आपली बस'ने प्रवास करतात. आपली बसची सेवा उत्तम असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु देखभाल, दुरुस्तीअभावी प्रवाशांच्या सुरक्षेची कुठलीही खात्री नाही. मागील दोन वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.शहरात ३८० बसेस दररोज धावत आहेत. यातील २०० बस दहा वर्षे जुन्या आहेत. या बसमुळे प्रदूषण वाढत असून आतील आसनेही बसण्यास योग्य नाहीत. याशिवाय बसच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका आहे.दंड आकारला जातो पण वसुली नाहीबस फेऱ्या कमी झाल्या, उशिरा बस सुटली, बस बंद ठेवल्यास संबंधित ऑपरेटला दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार अनेकदा दंड आकारला जातो. पण वसुली कुठे दिसत नाही. यात पडद्याआड तडजोड होत असल्याने नादुरुस्त बसची संख्या वाढली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे.सभापतींच्या भूमिके वर प्रश्नचिन्हशहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी. याची जबाबदारी महापालिकेच्या परिवहन विभागाची आहे. परंतु बसची अवस्था, नादुरूस्त बसमुळे होणारे अपघात याचा विचार करता या विभागावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत. परिवहन सभापती यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बसेस बंद पडल्याच्या घटनावर्ष             घटना२०१७-१८    ९२६०२०१८-१९     ७५०८२०१९-२०(सप्टेंबरपर्यत) ५,८५४

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक