शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

नागपूर मनपा सभागृहात सत्ताधारी-विरोधक भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०० कोटींच्या कर्जातून पाण्यासाठी ५० कोटी देणे व वनटाईम सेटलमेंटच्या प्रस्तावावरून महापालिके च्या विशेष ...

ठळक मुद्देकर्ज व वनटाइम सेटलमेंटच्या प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०० कोटींच्या कर्जातून पाण्यासाठी ५० कोटी देणे व वनटाईम सेटलमेंटच्या प्रस्तावावरून महापालिके च्या विशेष सभेत मंगळवारी सभागृहात तीन तास वादळी चर्चा झाली. सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांच्या विरोधाला न जुमानता दोन्ही प्रस्तावांना सभागृहात मंजुरी देण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सभा अपेक्षेप्रमाणे वादळी झाली.२०० कोटींचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच अपक्ष नगरसेवक आभा पांडे यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांच्या प्रभागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही पदाधिकाऱ्यांचे टँकर सुरू असल्याचा आरोप केला. यावर सत्तापक्षनेते संदीप जोशी व माजी महापौर प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला. ज्या लोकप्रतिनिधींचे टँकर सुरू आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. थेट कुणावर आरोप करणे चुक ीचे आहे. यावर पांडे यांनी प्रशासनाने माहिती द्यावी अशी मागणी केली. बाल्या बोरकर व दीपक चौधरी यांनीही नावे जाहीर करण्याची मागणी केली. मात्र काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी, मनोज सांगोळे आदींनी पांडे यांचे समर्थन केले. तर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही नाव जाहीर करण्यास सांगितले. थेट लोकप्रतिनिधीवर आरोप होत असल्याने त्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर सत्तापक्ष व विरोधी सदस्यांत आरोप-आरोप प्रत्यारोप झाले. परंतु अखेरपर्यंत नावांचा खुलासा झाला नाही.

योजनांच्या विलंबाला जबाबदार कोण?वनटाईम सेटलमेंटचा मुद्दा महापालिकेच्या आर्थिक स्थितीशी निगडीत आहे. पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. परंतु याबाबतचा प्रस्ताव जेमतेम पाच ओळीचा ठेवण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. निर्धारित कालावधीत योजना पूर्ण न होण्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. असे असतानाही ओसीडब्ल्यूचा वनटाईम सेटलमेंटचा प्रस्ताव आणल्याचा आरोप केला. नगसेवक संदीप सहारे, प्रफुल्ल गुडधे, कमलेश चौधरी, नितीन साठवणे, जुल्फेकार भुट्टो यांच्यासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रशासन व सत्तापक्षाच्या विरोधात नारेबाजी केली. या गोंधळात प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. एनईएसएलच्या बैठकीत विस्तृत चर्चा केल्यानंतर या वनटाईम सेटलमेंटच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेकडून आवश्यक तेव्हा आर्थिक मदत न झाल्याने पाणीपुरवठा योजनांना विलंब झाल्याची भूमिका अपर आयुक्त राम जोशी यांनी मांडली.

योजनेला विलंब होण्याला मनपाही जबाबदारशहरात २४ बाय ७ योजना राबविण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराला निर्धारित कालावधीत २७१ कोटी द्यावयाचे होते. परंतु १०२ कोटी देण्यात आले. महापालिकेला पेंच-४ प्रकल्प व जलकुंभाची कामे पूर्ण करावयाची होती. याला तीन ते चार वर्ष विलंब झाला. महापालिकेने वेळीच निधी उपलब्ध न के ल्याने प्रकल्पाला विलंब झाला. याला महापालिकाही जबाबदार असल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिली. ओसीडब्ल्यूवर कृपादृष्टीचा प्रश्नच नाही. २०१० मध्ये शहरात जलवाहिनीचे नेटवर्क ८६.५१ कि.मी. होते. आता ते ८७१ कि.मी.झाले आहे. करारानुसार निधी उपलब्ध न झाल्यास व्याज देण्याची तरतूद आहे. परंतु आपण व्याज नाकारले आहे. पुढील सभागृहात ‘अ‍ॅक्शन टेकन’ रिपोर्ट सादर केला जाणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका