शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

नागपूर मनपाची अग्निशामक सेवा महागणार : एनओसी ते बंदोबस्त शुल्कात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:51 IST

शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशामक विभागाला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहेत. विभागाच्या सक्षमीकरणासोबतच बहुमजली इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र, विहिरींची सफाई, इमारतींची पाहणी, पाणीपुरवठा, प्रशिक्षण आदी शुल्कामध्ये दीड ते दोन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव अग्निशामक विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

ठळक मुद्देअग्निशामक विभागाने दिला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशामक विभागाला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहेत. विभागाच्या सक्षमीकरणासोबतच बहुमजली इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र, विहिरींची सफाई, इमारतींची पाहणी, पाणीपुरवठा, प्रशिक्षण आदी शुल्कामध्ये दीड ते दोन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव अग्निशामक विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. २ ऑगस्टला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून ही मागणी सुरू होती.प्रस्तावानुसार, एनओसीसाठी इमारत अग्निशमन सेवा शुल्कांतर्गत नकाशाच्या तपासणीचे शुल्क दोन टक्के ठेवले आहे. तर, इमारत सूचनापत्राच्या नुतनीकरण प्रमाणपत्राचे शुल्क दोन हजार रुपयांवरून वाढवून तीन हजार रुपये केले आहे. परिपूर्णता प्रमाणपत्र शुल्क दोन हजारांवरून १० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. यात, १५० वर्गमीटरपेक्षा अधिक मोठ्या व्यावसायिक इमारतीसाठी १० हजार रुपये तसेच निवासीसाठी पाच हजार रुपये आकारले जातील. इमारतीचा वार्षिक अग्निशामक शुल्क एक टक्का कायम ठेवले जाणार आहे. उद्योगासाठी फायर फिटनेस प्रमाणपत्र शुल्क अडीच हजार रुपयांवरून तीन हजार रुपये आणि अस्थायी बांधकाम, समारंभ, मंडप, प्रदर्शन, सर्कस, संमेलनासाठी अडीच हजारांवरून तीन हजार रुपये केले जाणार आहे.खासगी विहिरींच्या सफाईसाठी पूर्वी सहा तासासाठी ५०० रुपये घेतले जायचे. आता तीन तासासाठी ५०० रुपये शुल्क प्रस्तावित आहे. नंतरच्या प्रत्येक तासासाठी २०० रुपये अतिरिक्त घेतले जातील. मलवाहिनी, नालीचे लिकेज, अन्य कारणांमुळे विहिरींचे पाणी दूषित झाल्यास शुल्क घेतले जाणार नाही. अग्निशमन बंदोबस्त आठ तासासाठी वाहन व कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी चार हजार रु पये व प्रती तास ५०० रुपये आकारले जायचे. हे शुल्क आता सहा हजार रुपयापर्यंत वाढविले जाणार आहे.पाणीपुरवठ्यासाठी साडेचार ते पाच हजार लिटर क्षमतेच्या फायर टेंडरचा दर ५०० रुपयांवरून १००० रुपये, १० हजार लिटर क्षमता (पंपासह) टेंडरसाठी भाडे १२०० वरून २००० रुपये, १० हजार लिटर क्षमतेच्या टेंडरसाठी (पंपाशिवाय)८०० रुपयांवरून १५०० रुपये दर ठेवण्याचा प्रस्ताव आहे.मनपा सीमाक्षेत्राबाहेर अग्निशामक दलाचे वाहन बचाव कार्यासाठी जात असेल तर यापुढे प्रति किमी ४० रुपये भाडे आकारले जाईल. आधी आठ तासांसाठी दोन हजार रुपये दर होता. पंपिंग चार्ज ५०० रुपये होता. टीटीएलचे भाडे प्रति तास चार हजार रुपये निर्धारित केले आहेत.फायर ऑडिटसाठी तीन हजार रुपये, प्रशिक्षणासाठी प्रती व्यक्ती प्रती माह एक हजार रुपये, वॉटर रेस्क्यूकरिता प्रती तासाला ५०० रुपयांवरून एक हजार रुपये आकारणी करण्याचा प्रस्ताव आहे. फटाके, मूर्ती दुकान तसेच अन्य अस्थायी दुकानांसाठी एनओसी घेण्यासाठी दोन हजार रुपये दर आकारला जाईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाInflationमहागाई