शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नगरसेवकांना आली जाग; फॉगिंग मशीनसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:52 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार १५१ नगरसेवकांना स्वच्छतेसाठी काय केले अन् काय करू इच्छिता याबाबतचे शपथपत्र दाखल करावयाचे असल्याने नगरसेवकांना जाग आली आहे. प्रभागात औषध फवारीसाठी फॉगिंग मशीन उपलब्ध व्हावी, म्हणून त्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येक प्रभागासाठी दोन छोट्या फॉगिंग मशीन तातडीने उपलब्ध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता आरोग्य विभागाकडून तातडीने फॉगिंग मशीन उपलब्ध होण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्देशपथपत्राच्या धास्तीने अचानक मागणी वाढली : स्वच्छता व नाल्या सफाईच्या फोटोचे संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार १५१ नगरसेवकांना स्वच्छतेसाठी काय केले अन् काय करू इच्छिता याबाबतचे शपथपत्र दाखल करावयाचे असल्याने नगरसेवकांना जाग आली आहे. प्रभागात औषध फवारीसाठी फॉगिंग मशीन उपलब्ध व्हावी, म्हणून त्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येक प्रभागासाठी दोन छोट्या फॉगिंग मशीन तातडीने उपलब्ध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता आरोग्य विभागाकडून तातडीने फॉगिंग मशीन उपलब्ध होण्याची शक्यता नाही.गेल्या काही महिन्यात शहरातील सर्वच भागात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. डेंग्यू व स्क्रब टायफसचे रुग्ण वाढले आहेत. असे असूनही अनेक नगरसेवक त्यांच्या प्रभागात फिरकत नव्हते. शपथपत्रात स्वच्छतेबाबत केलेल्या कामाची माहिती द्यावयाची असल्याने नगरसेवकांना जाग आली आहे. आरोग्य विभागाकडे पाच मोठ्या फॉगिंग मशीन आहेत. महिन्यातून एकदा प्रत्येक प्रभागात फॉगिंग करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मागणी करूनही या मशीन उपलब्ध होत नाही. तसेच २० हॅन्ड फॉगिंग मशीन आहेत. ज्या वस्त्यात मोठी फॉगिंग मशीन वापरणे शक्य नाही, अशा भागात या मशीनचा वापर केला जातो. मोठी मशीन उपलब्ध होत नसल्याने प्रत्येक प्रभागासाठी दोन छोट्या फॉगिंग मशीन उपलब्ध करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.प्रभागातील नाल्या व गडर लाईन तुंबल्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणारे नगरसेवक सेवेसाठी तत्पर झाले आहेत. तक्रार येताच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सफाई कामगार उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे. प्रभागात न दिसणाऱ्या नगरसेवकांच्या दर्शनाची नागरिकांत उलटसुलट चर्चा आहे.स्वच्छतेच्या फोटोचे संकलनस्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात सहभागी नगरसेवक हातात झाडू घेतल्याचे फोटो शोधत आहेत. प्रभागात राबविलेले स्वच्छता अभियान, नाल्या दुरुस्ती याचे फोटो संकलन करून शपथपत्रासोबत जोडणार आहेत. मात्र अशा नगरसेवकांची संख्या मोजकीच आहे. अनेक जण महापालिक  निवडणुकीनंतर प्रभागात फिरकलेले नाहीत. अशा नगरसेवकांना शपथपत्रात कोणती माहिती द्यावी, असा प्रश्न पडला आहे. आपसात याबाबत चर्चा सुरू आहे. कुणी शपथपत्र बनविले का, याचा शोध घेत आहेत. दुसऱ्याच्या शपथपत्राची कॉपी करून सादर करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर