शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेची थकबाकी ५१९ कोटींची, वसुली मात्र २५ हजाराची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 10:49 IST

व्यावसायिकांनी गेल्या पाच वर्षांत प्रत्येक वित्तीय वर्षात वार्षिक विवरणांची पूर्तता करणे आवश्यक होते. मात्र बहुतांश व्यावसायिकांनी वार्षिक विवरणपत्र दाखल केले नाही.

ठळक मुद्देमनपाच्या एलबीटी विभागापुढे पेच २४६ व्यापाऱ्यांची सील केलेली बँक खाती सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: २०१३-१४ पासून थकीत असलेल्या ५१९ कोटींच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिकेच्या एलबीटी विभागाने ५९८ व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानतंरही १५ दिवसात थकबाकी न भरल्याने २४६ व्यावसायिकांची बँक खाती सील केली. या विरोधात व्यावसायिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले. अधिकाऱ्यांनी सील केलेले खाते सुरू करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे थकबाकीदारांना दिलासा मिळाला. परंतु एलबीटी विभागाच्या मेहनतीवर पाणी फेरल्याने ५१९ कोटींच्या थकबाकीपैकी जेमतेम २५ हजार वसूल झाले.राज्य सरकारने जकात रद्द करून १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू केला होता. परंतु व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेता १ आॅगस्ट २०१५ पर्यंत दरवर्षी ५० कोटीपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांवरील एलबीटी रद्द करण्यात आला. त्यानतंर १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू करण्यात आला. यासोबतच एलबीटी संपुष्टात आला. परंतु एलबीटी सुरू असतानाच्या पाच वर्षाच्या कालावधीत व्यावसायिकांनी एलबीटी भरलेला नाही. तर अनेक व्यावसायिकांनी वित्तीय वर्षात आयकर विभागाकडे सादर केलेल्या विवरण पत्राच्या तुलनेत एलबीटी भरलेला नाही, अशा व्यावसायिकांचा डाटा आयकर विभागाकडून प्राप्त केला आहे. शेकडो व्यावसायिकांनी एलबीटीमधील तरतुदीच्या वार्षिक उलाढालीची माहिती एलबीटी विभागाला दिली नाही. अथवा रिटर्न सादर केले नाही. अनेकांनी चुकीची माहिती सादर केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या झोन स्तरावरील एलबीटी विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अशा व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यानतंरही त्यांनी एलबीटी न भरल्याने त्यांचे बँक खाते सील करण्यात आले होते, अशी माहिती एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. वास्तविक व्यावसायिकांनी गेल्या पाच वर्षांत प्रत्येक वित्तीय वर्षात वार्षिक विवरणांची पूर्तता करणे आवश्यक होते. मात्र बहुतांश व्यावसायिकांनी वार्षिक विवरणपत्र दाखल केले नाही. त्यामुळे अशा व्यावसायिकांच्या उलाढालीचा डाटा संकलित करण्यात आला आहे. यात काही व्यापाऱ्यांनी सादर केलेले विवरण पत्र व प्रत्यक्ष उलाढाल यात मोठी तफावत आढळून आली. अशा व्यावसायिकचे मूल्यांकन करण्यात आले. थकबाकी व त्यावरील दंडासह ही रक्कम ७०३ कोटींच्या जवळपास आहे.

बिकट आर्थिक स्थिती कशी सावरणार?एलबीटीची थकबाकी असलेल्या ५९८ व्यावसायिकांपैकी २४६ व्यावसायिकांना नोटीस बजावून या सर्वांचे बँक खाते सील करण्यात आले होते. थकबाकी वसुली व्हावी, हा यामागील हेतू होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला, पण अशा निर्णयातून महापालिकेची आर्थिक स्थिती कशी सावरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारवाईत राजकीय हस्तक्षेपव्यावसायिकांनी एलबीटी भरणे अपेक्षित होते. तो त्यांनी जमा केलेला नाही. अशा व्यावसायिकांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करता येते. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे एलबीटी विभागाला कारवाई करताना अडचणी येतात. महापालिकेची आर्थिक स्थिती अद्याप सावरलेली नाही. पदाधिकाऱ्यांकडून कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला जातो. परंतु नियमानुसार कर वसुली करताना राजकीय हस्तक्षेप होतो. यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोंडी होत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका