शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नागपूर मनपाची ‘आपली बस’ कधीही होऊ शकते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:07 IST

आॅक्टोबर महिन्यापासून ‘आपली बस’च्या आॅपरेटर्सला महापालिका परिवहन विभागातर्फे मोबदला देण्यात आलेला नाही. आॅपरेटरने बुधवारी आयुक्त, परिवहन व्यवस्थापक व वित्त अधिकारी यांना पत्र पाठवून स्पष्टपणे सांगितले आहे की, निधीअभावी बसचे संचालन थांबू शकते. असे झाले तर ‘आपली बस’ बंद पडून नागपूरकर प्रवाशांवर संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देआर्थिक संकटाचे कारण : वित्त विभागाची मनमानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅक्टोबर महिन्यापासून ‘आपली बस’च्या आॅपरेटर्सला महापालिका परिवहन विभागातर्फे मोबदला देण्यात आलेला नाही. तीन रेड बस आॅपरेटर, एक ग्रीन बस आॅपरेटर व आयबीटीएम आॅपरेटरचे सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये महापालिकेकडे थकीत आहेत. दरम्यान, संबंधित आॅपरेटर्सनी ड्रायव्हर, कंडक्टरला वेतन मिळाले नसल्याचे सांगत काम बंद करण्याची सूचना परिवहन विभाग व परिवहन समितीला दिली आहे. आॅपरेटरने बुधवारी आयुक्त, परिवहन व्यवस्थापक व वित्त अधिकारी यांना पत्र पाठवून स्पष्टपणे सांगितले आहे की, निधीअभावी बसचे संचालन थांबू शकते. असे झाले तर ‘आपली बस’ बंद पडून नागपूरकर प्रवाशांवर संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आॅपरेटरने १४ नोव्हेंबर, ९ डिसेंबर, १८ डिसेंबर, २८ डिसेंबर २०१७ रोजी महापालिका प्रशासनाला पत्र लिहून थकीत बिल देण्याची मागणी केली होती. सोबत आपल्याकडे निधीची कमतरता असल्याचे सांगितले होते. ६ जानेवारी रोजी पुन्हा प्रशासनाला पत्र लिहून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासह डिझेलसाठीही पैसे शिल्लक नसल्याचे कळविले होते. मात्र, त्यानंतरही परिवहन व्यवस्थापकांकडून केवळ आश्वासनेच मिळाली. थकबाकी मिळालीच नाही. प्राप्त माहितीनुसार आठवडाभरापूर्वी थकबाकीसंदर्भात आॅपरेटरने परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या माध्यमातून वित्त अधिकारी मोना ठाकूर यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, कुकडे यांनी दिलेले निर्देशही पाळण्यात आले नाहीत. बुधवारी दिवसभर बस आॅपरेटर महापालिकेत चकरा मारत होते. मात्र, त्यांचे कुणीच ऐकून घेतले नाही. आॅपरेटर वित्त विभागाकडे गेले होते. मात्र, वित्त अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, तिकिटांपासून येणाऱ्या पैशातून गरज भागवावी, असे परिवहन व्यवस्थापकांनी सांगितले आहे. महापालिकेकडे स्वत:चा निधी नाही. त्यामुळे ते थकबाकी देऊ शकत नाही.कुठे जात आहे निधी ? वित्त अधिकारी ठाकूर या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. निधी उपलब्ध नाही, असे एकच उत्तर त्या देतात. शेवटी ५१ कोटी रुपयांचे जीएसटी अनुदान, मालमत्ता कराचे १२ ते १५ कोटी रुपये व अन्य विभागाकडून येणारे कोट्यवधी रुपये जातात कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामांच्या फाईल्स तर पूर्णपणे रखडल्या आहेत.पूर्णवेळ वित्त अधिकारी नाही महापालिकेतील वित्त अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेवर आर्थिक संकट ओढवले आहे, असा आरोप यापूर्वीच कंत्राटदार संघटनेने केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेत पूर्णवेळ वित्त अधिकारी नाही. नागपूरला उपराजधानीचा दर्जा आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. राज्य सरकारने पूर्णवेळ वित्त अधिकारी देणे आवश्यक आहे. असेच सुरू राहिले तर माहापालिकेची आर्थिक गाडी रुळावरून घसरेल व त्यामुळे महापालिकेची प्रतिमा खालावण्याचा धोका आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक