शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाची अ‍ॅडव्हर्टायझिंग पॉलिसी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:06 IST

दि आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग पॉलिसी २००१ नुसार जाहिरात परवान्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत महसूल जमा व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.

ठळक मुद्देकसे वाढणार उत्पन्न परवानगी न घेता लागताहेत होर्डिंग

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची गरज आहे. मालमत्ता, नगररचना व पाणीपट्टी असे मुख्य आर्थिक स्रोत असले तरी जाहिरातीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. दि आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग पॉलिसी २००१ नुसार जाहिरात परवान्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत महसूल जमा व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.महापालिकेचे किती, खासगी होर्डिंग किती याची माहिती जाहिरात विभागाकडे असे अपेक्षित आहे. परंतु अवैध होर्डिंगवर कारवाई केली जात नाही. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या जागेवर, चौकाचौकात मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग लावले जातात. दि आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग पॉलिसी २००१ नुसार जाहिरात लावण्यासाठी महापालिकेच्या बाजार विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांनी नियमानुसार शुल्क भरणे आवश्यक आहे. परंतु कोणत्याही स्वरुपाचे शुल्क न भरता शहराच्या सर्वच भागात सर्रास जाहिरातबाजी सुरू आहे.नियमानुसार घराचे बांधकाम केले नसेल, अतिरिक्त बांधकाम असेल, दुकानापुढे शेड उभारले असेल तर महापालिकेतर्फे तत्परतेने कारवाई केली जाते. परंतु उत्पन्नात वाढ होईल अशा अवैध होर्डिंगवर कारवाई के ली जात नाही. यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. अवैध होर्डिंग लावणाऱ्यात राजकीय नेते व शिकवणी वर्ग चालविणाºयांचा मोठा हातभार आहे. शहरातील सर्वच भागात चौकाचौकात व रस्त्यांच्या बाजूला, खासगी व शासकीय जागांवर अवैध होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. अवैध होर्डिंग व बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. परंतु कारवाई होत नाही. वास्तविक खासगी निवासी मालमत्तेवर जाहिरात फलक उभारून मालमत्तेचे व्यावसायिक उपयोग करीत असल्यास अशा मालमत्तावर अतिरिक्त टॅक्स आकारता येतो. अशा स्वरुपाचा टॅक्स वसूल करण्याच्या सूचना झोन कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यानुसार कारवाई केली जात नाही. महापालिकेच्या जाहीरात धोरणानुसार प्रतिष्ठाने व दुकानाव र लावलेल्या फलकावर शुल्क आकारता येतो. परंतु या दृष्टीने बाजार विभागाकडून प्रयत्न होताना दिसत नाही.

...तर बाजार विभागाचे उत्पन्न वाढेलमहापालिकेच्या बाजार विभागाने दि आऊटडोअर अ‍ॅडव्हरटायजींग पॉलिसी २००१ नुसार कामकाज करणे अपेक्षित आहे. शहरात किती आऊटडोअर होर्डिंग लागलेले आहेत. त्यात मनपाचे किती, खासगी कंपन्यांचे किती याची माहिती विभागाकडे असणे अपेक्षित आहे. मालमत्ताधारकांनी वा व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर कारवाई केली जाते. मात्र अवैध होर्डिंगसंदर्भात कारवाई केली जात नाही. शहरातील मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलकांच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ होऊ शकते. या दृष्टीने विभागाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे.- प्रवीण दटके,माजी महापौर

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका