शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा २०० कोटींचे कर्ज घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 20:43 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मोठ्या भांडवली स्वरूपाच्या प्रकल्पाकरिता असलेला आर्थिक वाटा उचलण्यासाठी तिजोरीत पैसा नाही. याचा विचार करता महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देबिकट आर्थिक स्थितीतून सावरण्याचा प्रयत्न : मोठ्या प्रकल्पातील आर्थिक वाटा उचलणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मोठ्या भांडवली स्वरूपाच्या प्रकल्पाकरिता असलेला आर्थिक वाटा उचलण्यासाठी तिजोरीत पैसा नाही. याचा विचार करता महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरू असून, काही प्रस्तावित आहेत. यात स्मार्ट सिटी प्रकल्प, सिमेंट रस्ते, पथदिव्यांचे एलईडी दिव्यांमध्ये रूपांतरण करणे, हुडकेश्वर-नरसाळा विकास, पाणी पुरवठा योजना, झोपडपट्टी पुनर्वसनअंतर्गत कामे, भांडेवाडी एसटीपी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो रेल्वे प्रकल्पातील महापालिकेचा वाटा व नासुप्रला द्यावयाचे अंशदान यासाठी महापालिकेला पुढील पाच ते सात वर्षांत २०४७.४५ कोटींची गरज भासणार आहे.यातील काही प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करावयाचा आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता, निधी उपलब्ध करणे शक्य नाही. याचा विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कर्ज घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.पेंच टप्पा -४ भाग -१ साठी काही वर्षांपूर्वी महापालिकेने २०० कोटींंचे कर्ज घेतले होते. यापैकी १७६.०८ कोटींची परतफेड केली आहे. सद्यस्थितीत २३.९२ कोटींचे कर्ज शिल्लक आहे. या कर्जाची परतफेड डिसेंबर २०१८ पर्यंत होणार आहे. मात्र प्रस्तावानुसार २०० कोटींचे पुन:एकीकरण कर्जाची उभारणी करतेवेळी महापालिकेकडील शिल्लक कर्जाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महापालिकेला प्राप्त होणार आहे.२०० कोटींच्या कर्जाची परतफेड पुढील सात वर्षांत म्हणजेच ८४ हप्त्यात केली जाणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे.एलबीटी अनुदानात कपातमहापालिकेला दर महिन्याला शासनाकडून ५० ते ५२ कोटींचे अनुदान मिळत होते. मात्र अपेक्षित अनुदान मिळत नसल्याने पदाधिकारी व प्रशासनाने राज्य शासनाकडे दर महिन्याला ८५ ते ९० कोटींच्या वाढीव अनुदानाची मागणी केली होती. यासंदर्भात मुंबईत बैठकही झाली; परंतु मार्च महिन्यात महापालिके ला २७ कोटी मिळाले आहे. शासनाने अनुदानात कपात केल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.महसुलात ६०० कोटीची तूटस्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी जून महिन्यात २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु जीएसटीने सत्ताधाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. मार्चअखेरीस महापालिकेच्या तिजोरीत फार तर १५०० ते १६०० कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. जवळपास ६०० कोटींची तूट येणार आहे. ही तूट कशी भरून काढणार असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. २०० कोटींच्या कर्जामुळे थोडाफार दिलासा मिळेल अशी आशा आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर