शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

नागपूर मनपा तीन महिन्यात लावणार ८२ हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 20:59 IST

महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहरात तीन महिन्यात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहे. महापालिका १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अभियान राबविणार आहे. यासाठी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे सहकार्य घेणार आहे.

ठळक मुद्दे१ जुलै ते ३० सप्टेबर दरम्यान अभियान: स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहरात तीन महिन्यात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहे. महापालिका १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अभियान राबविणार आहे. यासाठी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे सहकार्य घेणार आहे.नागपूर शहरातील अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मनपा मुख्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. आयुक्त अभिजित बांगर, प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, दुर्बल घटक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, प्रवीण भिसीकर, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा. श्रीनिवास, निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, वनस्पती शास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे, एसबीएम महाविद्यालयाचे अजिंक्य धोटे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आज प्रत्येकाने वृक्ष लावणे गरजेचे आहे. विकासासोबत वृक्षांची कत्तल होऊ नये, याची काळजीही घेतली पाहिजे. ‘ग्रीन सिटी’ म्हणून नागपूरला देशात क्रमांक एक करण्यासाठी १ जुलैच्या वृक्षलागवड मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नंदा जिचकार यांनी यावेळी केले.अभिजित बांगर म्हणाले, वृक्षलागवडीसोबतच असलेल्या वृक्षांचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यासाठी मनपाने धोरण तयार केले आहे. पण यापेक्षाही नागरिकांनी जागरुक असणे गरजेचे आहे. झाड वाचविण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे, यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी पर्यावरणप्रेमींनीही सूचना मांडल्या. यावेळी बोलताना वनस्पतीशास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे यांनी सध्या सुकलेल्या तलावातील माती काढून ती रस्ता दुभाजकांमध्ये टाका, शिवाय स्थानिक वृक्षांची लागवड करण्याची सूचना केली. ग्रीन फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटजी यांनी झाड लावण्यासोबतच झाड वाचविण्यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. जी झाडे लावलीत तिला जगविणे आणि जी आहेत त्याचेही जतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.वृक्षलागवड मोहिमेचे सादरीकरण करण्यात आले. उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्षलागवड तयारी संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. ८२ हजार ५०० झाडांव्यतिरिक्त नागपूर शहरातील सिमेंट आणि डांबरी रस्त्यांच्या दुतर्फा आणि रस्ता दुभाजकांवर ५० हजार झाडे लावण्याचेही प्रस्तावित असून त्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही उद्यान अधीक्षक चोरपगार यांनी यावेळी दिली.स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नगरसेविका संगीता गिऱ्हे, नगरसेवक मुन्ना पोकुलवार, किशोर वानखेडे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनाली कडू, आशा उईके, नगरसेवक निशांत गांधी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, हरीश राऊत, प्रकाश वराडे, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, स्मिता काळे यांच्यासह सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.झाडांच्या संगोपनावर विद्यार्थ्यांना गुणविद्यापीठाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक रोपटे भेट म्हणून देण्यात येईल. तीन वर्षे त्याचे संगोपन त्याने करावे. त्यावर गुण देण्यात येईल, ही अभिनव संकल्पना विद्यापीठ अमलात आणणार असल्याचे प्रा. श्रीनिवास यांनी सांगितले. निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, एसबीएमचे अजिंक्य धोटे व अन्य प्रतिनिधींनीही यावेळी आपले विचार मांडले आणि वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका