शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेवर संपाचे सावट : आर्थिक संकटही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:55 IST

महापालिका आर्थिक संकटात आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कंत्राटदरांनी कामे बंद करून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिक्षकही आंदोलनाच्या तयारीत असतानाच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने सहावा वेतन आयोग व महागाई भत्त्याची थकबाकी यासह अन्य मागण्यासाठी बेमुदत संपाची तयारी चालविली आहे. प्रशासनाला संपाची नोटीस देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून स्वाक्षरी अभियान राबविले जात आहे. याला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसात दीड हजार कर्मचाऱ्यांनी यावर सह्या केल्याने महापालिकेवर संपाचे सावट आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आर्थिक संकटात आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कंत्राटदरांनी कामे बंद करून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिक्षकही आंदोलनाच्या तयारीत असतानाच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने सहावा वेतन आयोग व महागाई भत्त्याची थकबाकी यासह अन्य मागण्यासाठी बेमुदत संपाची तयारी चालविली आहे. प्रशासनाला संपाची नोटीस देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून स्वाक्षरी अभियान राबविले जात आहे. याला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसात दीड हजार कर्मचाऱ्यांनी यावर सह्या केल्याने महापालिकेवर संपाचे सावट आहे.विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. परंतु प्रशासन वर्षभरापासून नुसती आश्वासने देत आहे. आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करून महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ करीत आहे. कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना महिनाभरापूर्वी मागण्याचे निवेदन दिले होेते. यावर त्यांनी आयुक्तांना बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयुक्तांनी कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. परंतु यात ठोस निर्णय झाला नाही. त्यानंतर कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात संविधान चौकात तीन दिवस उपोषण करण्यात आले. उपोषणाची सांगता करताना न्याय न मिळाल्यास मुंडण आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नाही.यामुळे आता कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची तयारी सुरू केली आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे बेमुदत संपाशिवाय पर्याय नाही. त्याकरिता कायद्यानुसार नोटीस देण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत एकमताने घेण्यात आला. परंतु मान्यताप्राप्त संघटनेच्या घटनेप्रमाणे संपाची नोटीस प्रशासनाला देण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची लेखी सहमती आवश्यक आहे. या निर्णयाला बहुमताने संमती मिळाल्यानंतर बेमुदत संपाची नोटीस दिली जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांनी दिली.२०११ पासून नुसती आश्वासनेप्रशासनाने सेवाज्येष्ठता यादी तातडीने प्रकाशित करू, तसेच महिनाभरात पदोन्नती, तर १४ महिन्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या वेतनासोबत आॅक्टोबर महिन्यात देण्यात येईल. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. परंतु याबाबतचा निश्चित कालावधी ठरलेला नाही. २०११ सालापासून कर्मचाऱ्यांना नुसती आश्वासनेच मिळत असल्याने कर्मचारी संघटना बेमुदत संपाच्या तयारीत आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाStrikeसंप