शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

नागपूर मनपाने जलकुंभासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:29 IST

नागपूर महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण जबाबदार अधिकाऱ्यांची नावे सांगण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे. जलकुंभाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्यामुळे ही बाब प्रकाशात आली.उच्च न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली आहे. मालकीहक्क नसल्याचे माहीत असतानाही मनपाने जलकुंभ बांधण्यासाठी वादातीत जमीन कशी निवडली, अशी विचारणा न्यायालयाने करून यावर ९ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश मनपाला दिला आहे. तसेच, या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी व नगरसेवक यांच्या नावांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यास सांगितले आहे. जलकुंभाच्या पायावर झालेला खर्च आणि जमीन मालकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, संबंधित रक्कम अधिकाऱ्यांच्या वेतनातून किंवा मनपाच्या निधीतून का वसूल करण्यात येऊ नये यावरही भूमिका स्पष्ट करण्यात यावी, असे निर्देश मनपाला देण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली.वादातीत जमिनीवर जलकुंभ उभारण्याविरुद्ध कृपा सागर सहकारी गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहमान अब्दुल जब्बार, जमीन मालक रजनी महाडिक व समीर महाडिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत मूलभूत विकास समितीचे सदस्य प्रकाश टेंभुर्णे यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. याचिकाकर्त्यांनी मौजा हुडकेश्वर (सर्वे नं. २०) येथे ले-आऊट टाकून त्यातील एकूण १७९ भूखंड वेगवेगळ्या व्यक्तींना विकले आहेत. यापैकी १७८ व १७९ क्रमांकाचे भूखंड सार्वजनिक उपयोगासाठी राखीव होते. ते भूखंड याचिकाकर्ते रजनी महाडिक व समीर महाडिक यांना अवैधरीत्या विकण्यात आले. या भूखंडांवर जलकुंभाऐवजी उद्यान विकसित करावे, असे मध्यस्थांचे म्हणणे आहे. मनपाने याच दोन भूखंडांवर जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. डी. व्ही. सिरास तर, मध्यस्थांतर्फे अ‍ॅड. विकास कुलसंगे यांनी कामकाज पाहिले.

अंतरिम आदेशामुळे बांधकाम थांबले१४ डिसेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने मनपाला नोटीस बजावून या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला होता. त्यामुळे जलकुंभाचे बांधकाम थांबविण्यात आले. परंतु, तेव्हापर्यंत जलकुंभाच्या पायावर मनपाचे काही लाख रुपये खर्च झाले होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका