शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाला दिलासा : जीएसटी अनुदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:19 IST

दर महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेच्या खात्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुदान जमा होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी अनुदानात वाढ करण्याची ग्वाही दिली होती. १७ नोव्हेंबरच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ८६.१७ कोटींचे अनुदान महापालिकेच्या खात्यात जमा झाले आहे. वाढीव अनुदान प्राप्त झाल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देडिसेंंबर महिन्यात ८६.१७ कोटी मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेच्या खात्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुदान जमा होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी अनुदानात वाढ करण्याची ग्वाही दिली होती. १७ नोव्हेंबरच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ८६.१७ कोटींचे अनुदान महापालिकेच्या खात्यात जमा झाले आहे. वाढीव अनुदान प्राप्त झाल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.केंद्र सरकारने १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागपूर महापालिकेला सरकारकडून जीएसटी अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ४२.४४ कोटी मिळाले. त्यानुसार वर्षाला ५०९.२८ कोटी होतात. देण्यात आलेले अनुदान जकातीच्या तुलनेत कमी असल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनुदान वाढीची मागणी केली होती. त्यानुसार आॅगस्ट २०१७ मध्ये अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली. त्यानुसार या महिन्यात ६०.२८ कोटी देण्यात आले. मात्र दुसऱ्याच महिन्यात कपात करून ५१.३६ कोटींचे अनुदान देण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने अनुदान ५२.५७ कोटी केले.महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता सत्तापक्षनेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मुख्यमंत्र्याकडे वाढीव अनुदानाची मागणी केली. त्यानुसार मुंबई येथे आयोजित बैठकीत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी महापालिकेला वाढीव जीएसटी अनुदानाचे पत्र प्राप्त झाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGSTजीएसटी