शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाला ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 20:26 IST

Nagpur News, Nagpur Municipal Corporation नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ऊर्जा बचत गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोर्णिमा दिनानिमित्त ‘अर्थ डे नेटवर्क’कडून सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पोर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ऊर्जा बचत गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मनपाने पोर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची अर्थ डे नेटवर्क इंडियाने दखल घेतल्याने देशात नावलौकीक झाला आहे.मनपा आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे २०१४ पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पोर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोर्णिमेच्या रात्री ८ ते ९ या वेळात अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केलेजाते. यातून आतापर्यंत २ लाख ५३ हजार २०१ किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले. एलइडी पथदिवे प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिकेने १ लाख ३९ हजार ६९५ पारंपरिक पथदिव्यांचे रुपांतर एलइडी पथदिव्यांमध्ये केले. यामुळे वषार्ला २ लाख २७ हजार यूनिट्स एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन फुटप्रिंट्समध्ये बचत झाली आहे.

अर्थ डे नेटवर्क इंडियाद्वारे देशातील महापालिकांसाठी १० वेगवेगळ्या श्रेणीतील स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटजी व सुरभी जायस्वाल यांनी ऊर्जा बचत आणि हरीत आच्छादनाचा वाढता वापर या दोन श्रेणींमध्ये नागपूर महापालिकेचा नामांकन प्रस्ताव दाखल केला होता. अर्थ डे नेटवर्क इंडियाच्या भारतीय संचालक करुणा सिंग, महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्ण बी.यांनी यांनी अभिनंदन केले आहे.वेगवेगळ्या श्रेणींमध्ये देशातील पुरी, महाबळेश्वर, अहमदाबाद, थिरूअनंतपुरम आणि करीमनगर या महापालिकांनाही स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.सर्वांची जबाबदारी वाढली : संदीप जोशीया यशामागे नागरिकांनी दाखविलेला पुढाकार, समंजसपणा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणारी जनजागृतीची सुद्धा मोठी भूमिका आहे. या यशासह शहरातील नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. वीज बचतीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्र या महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका