शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नागपूर मनपा : नाव ठाकरेंचे, सभापती बनले धनविजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:11 IST

राज्यातील सत्ता गमावल्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर स्पष्ट दिसू लागला आहे. कर संकलन समिती सभापतीसाठी अविनाश ठाकरे यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु भाजपने सभापतीसाठी महेंद्र धनविजय यांचे नाव पुढे केले.

ठळक मुद्देपरिवहन समितीची जबाबदारी बोरकरांना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सत्ता गमावल्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर स्पष्ट दिसू लागला आहे. कर संकलन समिती सभापतीसाठी अविनाश ठाकरे यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु भाजपने सभापतीसाठी महेंद्र धनविजय यांचे नाव पुढे केले. तसेच परिवहन समिती सभापतीसाठी बाल्या बोरकर यांनी अर्ज भरला. दोघेही बिनविरोध निवडून आले. परंतु या दोन्ही समितीच्या निवडणुकीवरून मनपात चांगलीच चर्चा रंगली.सूत्रांनुसार अविनाश ठाकरे यांना निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी गुरुवारी दुपारी ३.३० वाजता सत्तापक्ष कार्यालयाकडून असे सांगण्यात आले की, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयात हजर राहायचे आहे. ठाकरे कौटुंबिक कामामुळे पुण्यात होते. त्यांनी इतक्या कमी वेळेत पुण्यावरून नागपूरला पोहोचणे शक्य होणार नसल्याने आपली असमर्थता दर्शविली. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वीच कर व परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. अशा परिस्थितीत एक दिवसापूर्वी सभापतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना देणे, हे समजण्यापलिकडे आहे. यामुळे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांचे अपयश स्पष्टपणे दिसून येते. त्यांची कार्यालयात येण्याची व जाण्याची कुठलीही निश्चित वेळ नाही. तेव्हा यासंदर्भात जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. मनपात अशीही चर्चा आहे की, ठाकरे यांना जाणिवपूर्वक निवडणूक कार्यक्रमाची माहिती उशिरा देण्यात आली. जेणेकरून ते उपस्थित राहू नये. ठाकरे यांना सभापती पद न मिळाल्याने, ओबीसी नगरसेवकांप्रति भाजपाचा उदासीनपणा उघडकीस आल्याचीही चर्चा होती.यासंदर्भात अविनाश ठाकरे यांनी सांगितले की, ते पुण्यात कौटुंबिक कारणामुळे आले आहेत. गुरुवारी दुपारी त्यांना निवडणुकीची माहिती मिळाली. इतक्या कमी वेळेत मी नागपूरला पोहोचू शकलो नसतो.सूत्रानुसार निवडणूक कार्यक्रमाची माहिती ठाकरे यांना वेळेवर न देणे, परिवहन सभापतीच्या कक्षात बदल यावरून मनपा मुख्यालयात भाजपचे वरिष्ठ नेते व वरिष्ठ नगरसेवक यांच्यात चांगलाच वाद झाला. संबंधित वरिष्ठ नेते शुक्रवारी अर्ज भरताना गैरहजर होते.बिनविरोध झाली निवडणूकभाजपकडून परिवहन समिती सभापतिपदासाठी नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि कर संकलन समिती सभापती पदासाठी महेंद्र धनविजय यांनी उमेदवारी अर्ज भरला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका बजावली. बंटी कुकडे आणि संदीप जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. कायद्यानुसार दोन्ही सभापती उर्वरित कार्यकाळापर्यंत सभापती राहतील. २० डिसेंबर रोजी आयोजित सभेत बोरकर आणि अविनाश ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी बोरकर आणि धनविजय यांनी परिवहन व कर समिती सभापतसाठी अर्ज सादर केला.जिथे होते, तिथेच आलेपरिवहन समिती सभापती म्हणून नाव निश्चित झाल्यानंतर बाल्या बोरकर यांनी बुधवारी उपमहापौर मनिषा कोठे यांच्या पत्राच्या आधारे आपला कक्ष सचिवांच्या कक्षात शिफ्ट करण्याची तयारी सुरु केली होती. बुधवारी तातडीने सामान शिफ्ट करण्यात आले. परंतु गुरुवारी असे चक्र फिरले की, शुक्रवारी सभापती कक्ष त्यांच्या मूळ जागीच शिफ्ट झाले. २४ तासात कक्ष शिफ्ट झाल्याचीही मनपात चर्चा होती. महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असून शुक्रवारी ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक