शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हायटेन्शन लाईनबाबत नागपूर महानगरपालिकेसह नासुप्र, महावितरण, स्पॅन्को, आर्मर्स बिल्डर्सला शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 11:34 IST

नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका, महावितरण, स्पॅन्को व आर्मर्स बिल्डर्स यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार शॉक दिला.

ठळक मुद्दे१० लाख रुपये जमा करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका, महावितरण, स्पॅन्को व आर्मर्स बिल्डर्स यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार शॉक दिला. धोकादायक हायटेन्शन लाईनच्या समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी स्थापन विशेष समितीच्या कामकाजाचा खर्च भागविण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा आदेश या पाचही जणांना देण्यात आला. ही रक्कम दोन आठवड्यांमध्ये न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात जमा करायची आहे.या कामासाठी समितीने सुरुवातीला २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. न्यायालयाने यावर पुनर्विचार करण्याची सूचना केल्यामुळे समितीने हा खर्च एक कोटी सहा लाख रुपयांवर आणला आहे. आर्मर्स बिल्डर्सने नारी येथील सुगतनगर येथे अवैधरीत्या बांधलेल्या एका इमारतीमध्ये प्रियांश व पीयूष धर या जुळ्या भावंडांचा हायटेन्शन लाईनच्या संपर्कात आल्यामुळे गेल्यावर्षी मृत्यू झाला. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. नियमानुसार कोणत्याही बांधकामाचे अंतर हायटेन्शन लाईनपासून चार मीटर असणे आवश्यक आहे. परंतु, शहरात अनेक ठिकाणी या नियमाची पायमल्ली करून बांधकामे करण्यात आली आहेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहणे तर, इतरांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे, अ‍ॅड. श्रीधर पुरोहित आदींनी कामकाज पाहिले.

त्या घरमालकांची सुनावणीहायटेन्शन लाईनपासून धोकादायक अंतरावर असलेल्या घरांच्या मालकांवर पुढील कारवाई करण्यापूर्वी त्यांना सुनावणीची संधी द्यायची आहे. ही जबाबदारी विशेष समितीवर असून त्यासंदर्भातील कार्यक्रम एक आठवड्यात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने समितीला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून एकूण २०४४ घरमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

धर भावंडांच्या कुटुंबीयांना १० लाखधर भावंडांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने आर्मर्स बिल्डर्सला दिला आहे. त्यामुळे आर्मर्स बिल्डर्सला एकूण २० लाख रुपये न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात जमा करावे लागणार आहेत. याशिवाय आर्मर्स बिल्डर्सने स्वत:शी संबंधित मालमत्तेत तृतीय पक्षाचा संबंध निर्माण करू नये, असा न्यायालयाचा अंतरिम आदेश आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका