शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा : एका तासात १०० कोटींचे प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:25 IST

सोमवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीत एका तासात १०० कोटींच्या ९७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देपूर्व नागपूरवर अध्यक्षांची कृपादृष्टी : ९७ पैकी ३४ प्रस्ताव पोहाणे यांच्या प्रभागातील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी संपूर्ण शहराचा विकास करण्याची ग्वाही दिली होती. परंतु स्थायी समिती बैठकींचा विचार करता, यात मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव प्रामुख्याने पूर्व नागपुरातील असून, या भागावर अध्यक्षांची विशेष कृपादृष्टी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीत एका तासात १०० कोटींच्या ९७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.विशेष म्हणजे, ९७ प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्षांचा प्रभाग व आजूबाजूच्या प्रभागातील आहेत. यात रस्ते, नाली, संरक्षण भिंत आदी कामांचा समावेश आहे. दोन दिवसापूर्वीच्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल १३२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्थायी समितीने विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत काही मिनिटात १३२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्याने सोमवारी प्रदीप पोहाणे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. स्थायी समितीची बैठक एक तास चालली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कोणताही हरकतीचा मुद्दा उपस्थित न केल्याने, सर्वसंमतीने विषय मंजूर करण्यात आले. विरोधक कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करीत नाही. त्यामुळे सत्तापक्षाच्या मर्जीनुसार कामकाज चालते. त्यातच सध्या पूर्व नागपुरातील एका नेत्याच्या सल्ल्यानुसार समितीचे कामकाज सुरू असल्याची महापालिकेत चर्चा आहे. त्यामुळे ज्या कामांना हिरवी झेंडी मिळाली, अशाच कामांचा कामकाजात समावेश असतो.सोमवारच्या बैठकीत प्रदीप पोहाणे यांच्या प्रभाग २४ मधील दोन डझन फाईल्स होत्या. तसेच प्रभाग ४, २३, २५ व २६ मधील फाईल्सची संख्या अधिक होती. हुडकेश्वर-नरसाळा येथील विकास कामांचे प्रस्ताव, व्हीआयपी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या जागेवर ७.४७ कोटी खर्चाच्या जॉगिंग ट्रॅकला मंजुरी देण्यात आली. शासकीय अनुदानातून हे काम केले जाणार आहे. वास्तविक व्हीआयपी रोडच्या गुणवत्तेबाबत जनमंचने रविवारी आंदोलनकेले होते.निधी गेला कुठे?स्थायी समितीची बैठक दुपारी १२ च्या सुमारास पार पडली. परंतु अध्यक्षांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले. वास्तविक बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली जाते. पोहाणे सायंकाळपर्यंत महापालिकेत होते. यादरम्यान विरोधी पक्षाचे नगरसेवक स्थायी समिती कक्षात आले. त्यांनी फाईलसंदर्भात विचारणा केली. पोहाणे यांनी निधी संपल्याचे सांगितले. यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी निधी गेला कु ठे, असा सवाल केला. तर फाईल मंजुरीसाठी सत्तापक्षाच्या काही नगरसेवकांनी सत्तापक्ष कार्यालयात धाव घेतली. परंतु निवडणूक संपल्यानंतर निधी मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका