शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 21:03 IST

Nagpur News महापालिकेचा पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रारूप प्रभाग रचना, त्यावरील हरकती व सुनावणी, आरक्षण सोडत, अद्ययावत मतदार यादी जाहीर करणे व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा विचारात घेता निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यांचाच कालावधी असल्याने वाढली उत्सुकताआयोगाच्या स्पष्ट निर्देशांची प्रतीक्षा

नागपूर : महापालिकेचा पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रारूप प्रभाग रचना, त्यावरील हरकती व सुनावणी, आरक्षण सोडत, अद्ययावत मतदार यादी जाहीर करणे व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा विचारात घेता निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील, असा विश्वास व्यक्त केला. (Nagpur Municipal Corporation elections likely to postponed ahead?)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातील. निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी कालावधी निश्चित करताना आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्रभाग रचनेचा केवळ कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत ऑक्टोबरमध्ये प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकांची अंतिम प्रभाग रचना कधी जाहीर होणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे; परंतु निवडणुकीला पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकांना केवळ प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हा आराखडा आयोगाला पाठवायचा आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविणे, हरकतींवर सुनावणी घेणे आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे, यासाठी साधारणत: महिनाभराचा कालावधी लागतो.

कधी होणार प्रारुप आराखडा?

महापालिका निवडणुकांचा कालावधी पाहता प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, आरक्षण सोडत काढणे याबाबत अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा कधी तयार होणार, असा प्रश्न नगरसेवक व इच्छुकांना पडला आहे. दुसरीकडे ‘ओबीसी’ आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर टाकाव्यात, अशी मागणी राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर पडण्याची चर्चा होत आहे.

आयोगाच्या आदेशानंतर तयारी

राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी कालावधी निश्चित करताना आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात येईल. सोडतीनंतर प्रारूप प्रभाग रचना हरकती, सूचनांसाठी प्रसिद्ध होईल. त्याचवेळी मतदार यादी अद्ययावत करणे, मतदान केंद्र तसेच निवडणुकीच्या इतर तयारीसाठी महापालिका प्रशासनाला वेळ लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे स्पष्ट आदेश आल्यानंतरच ही तयारी सुरू होणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका