सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्भवती, सिकलसेल व अॅनेमियाच्या रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली ‘आयर्न अॅण्ड फोलिक अॅसिड’च्या गोळ्यांची मुदत (एक्सपायरी) मार्च २०१८ ला संपत असल्याने नागपूर महानगरपालिकेला २० लाखांहून जास्त गोळ्या नष्ट कराव्या लागणार आहे. धक्कादायक म्हणजे, चार महिन्यांपूर्वी या ८० लाख गोळ्यांची मागणी खुद्द महानगरपालिकेने केली होती. आता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साठा पडून असल्याने साधा सर्दी, ताप, हगवण व इतरही आजाराच्या रुग्णांच्या माथी या गोळ्या मारल्या जात आहेत. लोकांच्या पैशांचा चुराडा करण्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा विसर नागपूर मनपाला पडल्याचे वास्तव आहे. आरोग्यकारक परिस्थितीचा अभाव व जोडीला आरोग्य सेवांची भीषण दुरावस्था आणि विषमता यामुळे मनपा रुग्णालयाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. दुसरीकडे गोरगरीब रुग्णांपर्यंत औषधे पोहचत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना मनपावर लाखो रुपये किमतीच्या जीवनावश्यक गोळ्या नष्ट करण्याची वेळ आली आहे.इंदिरा गांधी रुग्णालयात २३ हजारावर गोळ्या शिल्लकसूत्रानुसार, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाला मनपाच्या आरोग्य विभागाच्या औषध भंडारकडून १७ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘आयरन अॅण्ड फोलिक अॅसिड’च्या १० हजार गोळ्या मिळाल्या. जानेवारी महिन्यात ३६ हजार गोळ्या पुन्हा पाठविण्यात आल्या. सध्याच्या घडीला या रुग्णालयात २३ हजारावर गोळ्या शिल्लक आहेत. रुग्ण गोळ्यांवरील ‘एक्सपायरी डेट’ पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत. औषध वितरकाला दुसऱ्या गोळ्या देण्याची मागणी करीत असल्याचे रुग्णालयातील चित्र आहे.नोव्हेंबर महिन्यात ८० लाख गोळ्या मिळाल्यामनपाच्या तत्कालीन नोडल अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार नांदेड जिल्हा आरोग्य विभागाकडून ‘आयरन अॅण्ड फोलिक अॅसिड’च्या ८० लाख गोळ्या नोव्हेंबर २०१७ रोजी मिळाल्या. या सर्व गोळ्यांचे वितरण तीन रुग्णालयासह २६ बाह्य रुग्ण विभागांना करण्यात आले. सध्या अंदाजे २० लाख गोळ्यांचा साठा असण्याची शक्यता आहे.-नितीन देशमुखप्रमुख, औषध भंडार, आरोग्य विभाग मनपा
२० लाखांहून अधिक मुदतबाह्य औषधे नष्ट करण्याची नागपूर महानगरपालिकेवर नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 10:21 IST
गर्भवती, सिकलसेल व अॅनेमियाच्या रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली ‘आयर्न अॅण्ड फोलिक अॅसिड’च्या गोळ्यांची मुदत (एक्सपायरी) मार्च २०१८ ला संपत असल्याने नागपूर महानगरपालिकेला २० लाखांहून जास्त गोळ्या नष्ट कराव्या लागणार आहे.
२० लाखांहून अधिक मुदतबाह्य औषधे नष्ट करण्याची नागपूर महानगरपालिकेवर नामुष्की
ठळक मुद्दे-नोव्हेंबर महिन्यात मिळाल्या ८० लाख गोळ्या मनपाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाचे तत्कालीन नोडल अधिकाऱ्यांनी ‘आयर्न अॅण्ड फोलिक अॅसिड’ गोळ्यांची मागणी केली होती. त्यानुसार नांदेड जिल्हा आरोग्य विभागाने नोव्हेंबर २०१७ला ८० लाख गोळ्