शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा संकटात; मंजूर १५७ कोटी, दमडीही हाती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 11:32 IST

Nagpur News Nagpur Municipal Corporation सरकार बदलल्यानंतर मनपाला अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर मनपा मोठ्या आर्थिक संकटात आली आहे.

ठळक मुद्दे१३ कोटी रुपयांची कामे झाली पूर्ण

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : राज्याच्या मागील सरकारने नागपूरच्या विकास कार्यासाठी मुख्यमंत्री फंडातून १५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. नागपूर मनपाला संबंधित निधीतून विकास कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मनपानेही तत्परता दाखवीत १५७ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. ८७ कार्यासाठी १४८ कोटी रुपयांच्या निविदा कंत्राटदारांनी भरल्या. कंत्राटदारांनी १० ते १५ टक्के खाली जाऊन निविदा भरल्या; पण विशेष बाब अशी की, सरकार बदलल्यानंतर संबंधित निधीपैकी मनपाला अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर मनपा मोठ्या आर्थिक संकटात आली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरात विविध विकास कामांसाठी संबंधित राशीचे नियोजन करून रस्त्याची दुरुस्ती, नवीन सिमेंट रोड, अंतर्गत रस्ते आदींच्या ८७ कामांची यादी तयार करण्यात आली. यापैकी ८५ कामांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले. यापैकी २२ कामे पूर्ण झाली आहेत. २४ कामे सुरू आहेत, तर ३९ कामे अपूर्ण आहेत. जेवढी कामे झाली आहेत, त्यांची बिले कंत्राटदारांनी मनपा वित्त विभागाकडे सोपविली आहेत; परंतु वित्त विभागाने यापैकी एकाही बिलाला हात लावला नाही. कारण संबंधित मदत राशीपैकी एक रुपयाही मनपाला मिळालेला नाही.

वरिष्ठ अधिकारी म्हणाले, संबंधित राशीकरिता नागपूर मनपातर्फे अनेकदा राज्य शासनाला पत्र लिहिले आहे. या पत्रांवर अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. आताही पाठपुरावा करण्यात येत आहे.

लहान कंत्राटदारांनी थांबविले काम

दहा लाखांपर्यंत काम केलेल्या कंत्राटदारांनी बिल न मिळाल्याने कामे बंद केली आहेत. त्यामुळे अनेक भागांतील अपूर्ण कामांमुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जेव्हा नगरसेवक संबंधित कंत्राटदारांकडे काम पूर्ण करण्याची गोष्ट करतात तेव्हा ते जुने बिल अजूनही न मिळाल्याची आठवण त्यांना करून देतात. सत्तारूढ पक्षांतर्फे आश्वासन मिळाल्यानंतर काही मोठ्या कंत्राटदारांनी काम सुरू ठेवल्याची माहिती आहे.

अशी आहे स्थिती :

- १५७ कोटी मंजूर, त्यापैकी एक रुपयाही मिळालेला नाही.

- मनपाने ८७ कामांच्या निविदा काढल्या, १४८ कोटींच्या निविदा भरण्यात आल्या.

- १३ कोटी रुपयांची २२ कामे पूर्ण झाली, ३९ कामे अपूर्ण.

- मनपाने आतापर्यंत एकाही बिलावर निर्णय घेतलेला नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका