शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेचे बजेट पुन्हा लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 20:06 IST

महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प एप्रिल महिन्यातच सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु कोरोना संकट व त्यात झोन अधिकारी व विभाग प्रमुखांनी वेळेवर नियोजन सादर न केल्याने वेळोवेळी तारीख पुढे ढकलण्यात आली. आधी ३१ जुलै व नंतर १५ ऑगस्टला अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. परंतु तयारी न झाल्याने अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प एप्रिल महिन्यातच सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु कोरोना संकट व त्यात झोन अधिकारी व विभाग प्रमुखांनी वेळेवर नियोजन सादर न केल्याने वेळोवेळी तारीख पुढे ढकलण्यात आली. आधी ३१ जुलै व नंतर १५ ऑगस्टला अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. परंतु तयारी न झाल्याने अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर पडला आहे.जूनपूर्वी विभागप्रमुख व झोन कार्यालयाकडून खर्चाचे विवरण प्राप्त होणे अपेक्षित होते. पण विलंब लागल्याने अर्थसंकल्पाची तयारी शक्य झाली नाही.स्थायी समिती अध्यक्षाकडून साधारणपणे जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोना संकटाचाही तयारीवर परिणाम झाला. शहरातील विकास कामांना गती मिळावी या हेतूने एप्रिल महिन्यातच अर्थसंकल्प सादर करण्याचा झलके यांचा मानस होता. त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती. परंतु लॉकडाऊन कालावधीत कार्यालयीन कामकाज ठप्पच होते. मनपाची यंत्रणा कोविड-१९ च्या नियंत्रणात व्यस्त झाली. यामुळे नियोजन कोलमडल्याने अर्थसंकल्प लांबणीवर पडला.गेल्या वर्षी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी ३१९७ कोटींचा अर्थसकल्प सादर केला होता. आयुक्तांनी या अर्थसंकल्पाला कात्री लावत सुधारित अर्थसंकल्प २६९८ कोटीवर आणला. तर २०२०-२१ या वर्षाचा २५४७ कोटींचा प्रस्तावित अर्थसकल्प स्थायी समितीकडे सादर केला. राज्य सरकारने जीएसटी अनुदानात दर महिन्याला केलेली ४० कोटींची कपात व त्यात विशेष अनुदान प्राप्त होण्याची शक्यता नाही. याचा विचार करता आयुक्तांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात स्थायी समितीकडून फारशी वाढ होण्याची शक्यता नाही.जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरास्थायी समिती अध्यक्षाकडून साधारणपणे जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे. परंतु यावर्षी ३१ जुलैपर्यंत अर्थसंकल्प सादर करणे शक्य झाले नाही. त्यानंतर १५ ऑगस्ट ही तारीखसुद्धा निघून गेली.लॉकडाऊनचाही फटकाकोविड-१९ मुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत कार्यालयीन कामकाज जवळपास ठप्पच होते. मनपाची यंत्रणा कोरोना नियंत्रणा व्यस्त असल्याने यामुळे नियोजन कोलमडले त्यात वित्त विभाग व झोन कार्यालयाकडून खर्चाचे विवरण वेळेवर प्राप्त झाले नाही.प्रभागातील विकास कामांवर परिणाममनपाची आर्थिक स्थिती वाईट असल्याने प्रभागातील विकास कामे जवळपास ठप्पच आहेत. अत्यावश्यक कामांसाठीही निधी नाही. अर्थसंकल्प सादर न झाल्याने प्रभागातील विकास कामांना फटका बसला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प