शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा आयुक्तांनी लावली आर्थिक आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:53 IST

महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. तिजोरीवरील आर्थिक भार वाढला असून विकास कामांसाठी निधीची टंचाई जाणवू लागली आहे. महापालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी एक परिपत्रक काढत महापालिकेत एकप्रकारे आर्थिक आचारसंहिता लागू केली आहे. यामुळे निधीच्या खर्चावर मर्यादा येणार असून आयुक्तांनी एकप्रकारे अर्थसंकल्पाला कात्री लावली आहे. याचा परिणाम प्रभागातील विकास कामांवर होण्याची शक्यता असून नगरसेवकांची आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देनगरसेवकांची आर्थिक कोंडी : विकास कामे रखडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. तिजोरीवरील आर्थिक भार वाढला असून विकास कामांसाठी निधीची टंचाई जाणवू लागली आहे. महापालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी एक परिपत्रक काढत महापालिकेत एकप्रकारे आर्थिक आचारसंहिता लागू केली आहे. यामुळे निधीच्या खर्चावर मर्यादा येणार असून आयुक्तांनी एकप्रकारे अर्थसंकल्पाला कात्री लावली आहे. याचा परिणाम प्रभागातील विकास कामांवर होण्याची शक्यता असून नगरसेवकांची आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा यांनी २०१८-१९ चा तब्बल २९४५ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला़ मात्र, महापालिकेला मिळणारे अनुदान व इतर मार्गांनी येणारे उत्पन्न पाहता एवढे लक्ष्य गाठणे शक्य दिसत नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाही. यामुळे आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी अवास्तव खर्चावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी झोन कार्यालयांसाठी वार्षिक ६ कोटींच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. महापालिकेचे दहा झोन आहेत. प्रत्येक झोनला वर्षाला ६० लाखांपेक्षा जास्त खर्चाची कामे करता येणार नाहीत. एका झोनमध्ये जवळपास १२ ते १६ नगरसेवक आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या वाट्याला फक्त दीड ते दोन लाख रुपये येतील. यामुळे प्रभागातील किरकोळ कामेही होणार नाही. एकप्रकारे विकास कामांना ब्रेक लागणार आहे.उत्पन्नानुसार खर्च, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. मात्र, आयुक्तांच्या या भूमिकेवर सत्ताधारी नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली आहे तर विरोधी पक्षातील नगरसेवकांना आता हक्काचाही निधी मिळणार नाही याची चिंता सतावू लागली आहे.असे आहे परिपत्रक

  •  प्राप्त उत्पन्नाच्या आधारावरच खर्च केला जाईल़
  •  उत्पन्नाची स्थिती विचारात घेऊन प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकरिता अर्थात झोन कार्यालयाकरिता वार्षिक खर्चाची मर्यादा केवळ ६ कोटी इतकी राहील़
  •  झोनच्या साहायक आयुक्त आणि विभागप्रमुखांना ३ लाख, उपायुक्तांना ६ लाख, अपर आयुक्तांना १० लाखांपर्यंत खर्च करण्याचे अधिकार राहतील़ 
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त