शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:46 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच आवश्यक विकास कामांना मंजुरी घेण्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने स्थायी समितीचा २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर करण्याची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीची तयारी : जुन्याच योजना कार्यान्वित न झाल्याने नवीनचा समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच आवश्यक विकास कामांना मंजुरी घेण्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने स्थायी समितीचा २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर करण्याची तयारी सुरू आहे.अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने त्या कागदावरच राहतात. दरवर्षीचा हा अनुभव विचारात घेता व निधीअभावी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील प्रलंबित विकास कामांचा विचार करता पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन घोषणांचा समावेश राहणार नसल्याची माहिती स्थायी समितीच्या सदस्यांनी दिली.स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी पदभार स्वीकारताच निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने गेल्या दीड-दोन महिन्यात समितीला निर्णय घेता आला नाही. परंतु पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली. मागील समितीने मंजुरी दिलेल्या १३२.५७ कोटींच्या कामांना अद्याप निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे हा निधी पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात समायोजित केला जाणार आहे. महापालिकेच्या कंत्राटदारांना जानेवारी महिन्यापासून बिले मिळालेली नाही. ही रक्कम १५० ते २०० कोटींच्या आसपास आहे. यासाठी तरतूद करावी लागणार आहे. पुढील काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक आहे. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ५०० कोटीहून अधिक असले तरी प्रत्यक्ष वसुली २५० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही.तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता नवीन योजनांसाठी निधी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आधीच्या अर्थसंकल्पात समावेश असलेल्या परंतु अद्याप पूर्ण न झालेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करावी लागणार आहे. यामुळे प्रदीप पोहाणे यांची चिंता वाढली आहे.फाईलसाठी नगरसेवक आग्रहीअर्थसंकल्पात समावेश असलेल्या परंतु निधीअभावी कार्यादेश निघाले नाही, अशा प्रलंबित कामासाठी निधीची तरतूद करावी, अशी आग्रही भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. जुनी देणी व प्रलंबित कामांचा विचार करता, अर्थसंकल्पात नवीन कामांचा समावेश केला तरी निधी उपलब्ध होणार नाही. अशा प्रलंबित कामांचा समावेश प्रथेनुसार २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात करावा लागेल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प